• स्थानिक स्वराज्य संस्था

    स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना लोकशाही विकेंद्रीकरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीच्या पाठशाळा असेही म्हटले जाते. पंचायत राज हे महात्मा गांधीचे स्वप्न होते. भारतात प्राचीन काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे अस्तित्व होते. मौर्य आणि गुप्त काळात शहरी प्रशासनाबद्दलचे काही उल्लेख इतिहासात सापडतात. ब्रिटिश काळात नगरपालिका व महानगरपालिका सारख्या नागरी संस्था अस्तित्वात असल्या तरी त्यांना मर्यादित स्वरूपाचे अधिकार होते.सद्यस्थितीत स्थानिक प्रश्नाबाबतचे अधिकार आणि जबाबदारी त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ह्या संस्थांना दिलेल्या दिसून येतात. 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्था निर्माण करण्यात आली. 21 व्या शतकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात अनेक दोष निर्माण झाले आहेत. लोकशाही विकेंद्रीकरण आणि स्थानिक विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी हे दोष नष्ट करणे ही काळाची गरज आहे.

    Sthanik Swarajya Sanstha

    295.00
    Add to cart