• आधुनिक साहित्य : स्वरूप आणि समीक्षा

    वाचकांमधून चांगल्या समीक्षकांची निर्मिती होत असते. चांगला समीक्षक हा काही वेळेला सहित्यिकही असू शकतो. परंतु तो साहित्यिकच असला पाहिजे असे काही बंधन नाही. परंतु साहित्यिक असणार्‍याच्या संवेदनेच्या पार्श्वभूमीवर आस्वादकता तीव्र असल्यावर तो साहिथतयकांवर अवाजवी टीका करणार नाही, असा एक समज असतो. नाहीतर समीखक साहित्यिकांचा विरोधकच आहे, असे स्वरुप निर्माण करण्याचा प्रयत्न करतांनाही काही मंडळी दिसतात. अलीकडे तर काही साहिथत्यकांचे आणि समीक्षकांचे कंपू तयार होत असून ते एकमेकांची अकारण ‘वाहवाऽऽ’ करीत सुटले आहेत. त्यामुळे अस्सल आणि प्रज्ञावंत साहित्य उपेक्षित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

    Aadhunik Sahitya Swarup Aani Samiksha

    325.00
    Add to cart
  • आरोळी

    Aroli

    195.00
    Add to cart
  • बहुआयामी : जयवंत दळवी

    जयवंत दळवी म्हणजे साहित्यसृष्टीत अवतरलेले बहुआयामी सुंदर वास्तव!! दळवींनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने साहित्यातील अनेक प्रकार हाताळलेत. आणि प्रत्येक साहित्यप्रकारात आपल्या ‘परीसस्पर्शाने’ सुवर्णमयी आदर्श निर्माण केलेत. दळवींची प्रतिभा साहित्यप्रवाहात अखंड प्रवाहित राहिली. तिला आटणे माहित नाही. त्यामुळे दळवींच्या अनेक साहित्यकृती जन्माला आल्या अनेक कथा, कादंबर्‍या, अनेक नाटके, अनेक कलांतर-प्रकारांतर, प्रवासवर्णन सदरलेखन यामुळे दळवींचे आपोआपच बहुआयाम सिद्ध झालेत.

    Bahuaayami : Jaywant Dalvi

    195.00
    Add to cart
  • बा, तथागता!

    Ba, Tathagata!

    450.00
    Add to cart
  • बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा

    ‘बोली’ जगवण्याचे काम असाक्षर समूहाने कालखंडापासून अव्याहतपणे केले. किंबहूना त्यांच्या जगण्यातील संवेदनांचा आणि भावाभिव्यक्तीचा बोलीभाषा अविभाज्य भाग राहिला.
    बोलीचे सहज सोपे उच्चारण, त्यातील भावार्थांची प्रासादिकता निसर्गतःच समूहाला जोडणारी ठरली. अलीकडे काही अभ्यासक, संशोधक बोलीचे संशोधन करुन भाषाभ्यासाला नव्याने ऊर्जा देऊ पाहतात; ही बाब मानवी जीवनव्यवहार व विकासाच्या अनुषंगाने महत्वाची म्हणता येईल.
    माणसाच्या गतीशील जगण्याबरोबर बोली नष्ट होऊ नयेत; या पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न मला प्रकाश किरणांसारखे वाटतात !

    Bolibhasha Sanshodhanachya Navya Disha

    250.00
    Add to cart
  • साहित्यातील मानवतावाद

    माणसाच्या सर्वकष कल्याणाचा विचार मानवतावादात येतो. माणसाच्या सर्व समस्यांचे निराकरण मानवतावादात अपेक्षित आहे. माणूस हा मानवतावादाचा केंद्रबिंदू आहे. माणसाला कोणत्याही गटा-तटात किंवा भेदोभेदात अडकवणे चुकीचे आहे. धर्म, पंथ, जात, लिंग, वंश, देश, प्रदेश, अशा कोणत्याही भेदांत विघटिकत करुन माणसाचा विचार होऊ नये, कोणत्याही नैसर्गिक सुविधेपासून, लाभापासून माणसाला वंचित ठेवणे, ही मानवतावादविरोधी क्रिया आहे.
    साहित्य म्हणजे उच्चभ्रूंची मक्तेदारी का? साहित्य म्हणजे उच्चवर्गीयांच्या ऐय्याशी भावना का? साहित्य म्हणजे गोर्‍या वर्णाच्या लोकांचा उत्सव का? साहित्य म्हणजे श्रीमंताचा बडेजाव का? साहित्य म्हणजे फक्त साक्षर लोकांची अनुभूती का? साहित्य म्हणजे आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालेल्या लोकांची संकुचित सामाजिक जाणीव का? साहित्य म्हणजे गोरगरिबांची लाचारी तर नव्हे, साहित्य म्हणजे दुःखितांचा अनावर हुंकार तर नव्हे. साहित्य म्हणजे नाडलेपण, गाडलेपण तर नव्हे. साहित्य म्हणजे दीनदलितांची पिळवणूक तर नव्हे, साहित्य म्हणजे सामान्य माणसाची, किंबहुना असाक्षर माणसाची उपेक्षा तर नव्हे, साहित्य म्हणजे हजारो वर्षांपासूनच्या गुलामीत डांबलेल्या प्रत्येक घरातील स्त्रियांचे मुकेपण तर नव्हे, साहित्य म्हणजे खेडूतांना गावंढळ संबोधून संस्कृती प्रवाहाच्या बाहेर ढकलणे तर नव्हे?
    साहित्य लिहिणारा माणूस असतो, साहित्य वाचणारा माणूस असतो. साहित्यातून अभिव्यक्त होणाराही माणूसच असतो ; साहित्य वाचणारा माणूस असतो. साहित्यातून अभिव्यक्त होणाराही माणूसच असतो:; त्यामुळे साहित्य माणसाचे आहे; ते संस्कारित असणे गरजेचेच आहे. माणसासाठी साहित्य मानवतावादी पद्धतीने अभिव्यक्त झाले, तर मानवतावादी संस्कृती प्रवाहाला सक्षमता प्राप्त होऊ शकते!

    Sahityatil Manavatavad

    395.00
    Add to cart