• आंबेडकरी स्त्रीवाद

    आंबेडकरी स्त्रीवादाची मांडणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी केलेल्या मानवमुक्तीची आंदोलने, चळवळ त्यांनी घटनेत दिलेली सर्वशोषित आणि स्त्रियांना दिलेले मानवी हक्क, कायदे या सर्वांचा समग्रपणे विचार केला आहे. हिंदू कोड बिल मांडून स्त्रियांना संपत्तीचा वारसा हक्क, बहुपत्नीत्वाची पद्धत बंद करणे, विवाह, घटस्फोट या माध्यमातून स्त्रियांना मिळवून दिलेले हक्क, मतदानाचा दिलेला हक्क ज्याने भारतीय नागरिक बनली. कुटुंब नियोजनाची भूमिका सातत्याने मांडून तिच्या आरोग्यविषयक प्रश्नांना दिलेले प्राधान्य मजूर मंत्री असताना बालमजूर, वेठबिगारी बंदी, विडी, गिरणी, शेतमजुरी या समान वेतनाचा तरतूद करणे स्त्रियांना बाळंतपणाची सक्तीची रजा मंजूर करणे इ. सूक्ष्मविचार स्त्रियांचा एक बापच करू शकतो हा विचार बाबासाहेबांनी स्त्रियांबद्दल केलेला आहे. ज्यामुळे तिला स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या. स्त्रीला केवळ समाजात शिक्षणासाठी ऊर्मीच निर्माण केली नाही तर तिला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे स्वभान दिले.
    आंबेडकरी स्त्रीवाद आंबेडकरवादी साहित्यातून विशेषत्वाने काही प्रातिनिधिक आंबेडकरवादी लेखक आणि लेखिका यांच्या साहित्यातून, लेखनातून कसा सरूप झालेला आहे; प्रतिबिंबित झालेला आहे हा या ग्रंथलेखनाचा उद्देश्य आहे.

    Ambedkari Strivad

    175.00
    Add to cart