एखादी समस्या वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतीने व सुव्यवस्थितपणे सोडवणे म्हणजे संशोधन होय. संशोधन ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वस्तुनिष्ठ असते. या प्रक्रियेद्वारे प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. समस्येची उकल केली जाते. प्रश्नांची उत्तरे शोधतांना किंवा समस्येची उकल शोधतांना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रत्येक संशोधकाचा आपल्या संशोधनातून सत्य जगापुढे आणण्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच योग्य, प्रमाणित मापन साधनाद्वारे माहिती संकलित केली जाते. माहिती संकलित करतानाही ती योग्य न्यादर्शाकडूनच व्हावी याची दक्षता ठेवली जाते. त्या माहितीच्या स्वरुपावरुन योग्य संख्याशास्त्रीय परिमाणांचा उपयोग केला जातो व त्यावरुन अचूक निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न असतो. यावरुन संशोधक सत्य शोधण्याचाच प्रयत्न करीत असतो. दैनंदिन जीवनातही आपण वैज्ञानिक पद्धतीच्या पायऱ्यांचा उपयोग करुन समस्या सोडवत असतो व त्या अनुषंगाने ज्ञान मिळवत असतो.
प्रस्तुत पुस्तकात संशोधनाची संकल्पना स्पष्ट करून संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींचा उहापोह करण्यात आलेला आहे. संशोधन करण्यासाठी, संशोधन हा विषय शिकवण्यासाठी, संशोधनातील विविध संकल्पना समजवून घेण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.
Sanshodhan Paddhati Sankhyatmak Aani Gunatmak