प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकीयांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्योत्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रियांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Bharatacha Itihas (Prambhpasun Te CE 1205 Paryant)