प्राकृतिक भूगोल या पुस्तकात भूगोलाच्या विविध अंगाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीचे अंतरंग, भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबंधित सिद्धांत, खडक आणि विदारण, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याशिवाय वातावरणाचा अर्थ, वातावरणाची घटना आणि संरचना, तापमान, सौरशक्ती, वायूभार, वारे व वाऱ्याचे प्रकार, आर्द्रता, वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार, महासागर तळरचना, या तळरचनेमध्ये हिंदी व अटलांटिक महासागराच्या तळरचनेचा अभ्यास, सागरी प्रवाह, हिंदी व अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाचे चक्र इत्यादी घटकाविषयी अतिशय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
Prakurtik Bhugol