भारत हा जगातील सर्वात जास्त भौगोलिक विवीधता असणारा देश आहे. भारत हा उत्तरेकडील हिमालयाच्या हिमाच्छादित पर्वतराजीपासून दक्षिणेस हिंदी महासागराच्या किनाऱ्यापर्यंत विस्तीर्ण अशा भुभागावर पसरलेला आहे. भारताच्या विस्तृतपणामुळे व नैसर्गिक विविधतेमुळे भारताच्या हवामानाला एक वेगळेच वैशिष्टे व विविधता प्राप्त झाली आहे. जगातील विविध प्रकारच्या हवामानाचे अविष्कार भारतात आढळतात. भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग आहेत. भारतीय उपखंड हे जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. सद्य:स्थितीत भारत हा सामाजिक, आर्थिक व तांत्रिक क्षेत्रात आघाडीवर आहे.
सदरील पुस्तकात भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताचा प्राकृतिक विभाग, हवामान, नदीप्रणाली, मृदा, वनसंपदा, विविध धर्म, धर्माचे प्रकार, भाषा भाषाकुळे, भारतातील आदिवासी जमाती, जीवन पद्धती, त्यांचे वितरण, भारतातील रस्ते लोहमार्ग हवाईमार्ग, दळणवळण, खनिजसंपत्ती व त्यांचे वितरण, भारतातील शेती व तिचे प्रकार, समस्या इत्यादी विविधांगी बाबींचा सखोल परामर्श घेतलेला असून नकाशे व आकृत्यांचा आवश्यक तेथे समावेश केलेला आहे.
Bhartacha Bhugol