• आरोग्य मानसशास्त्र

    आरोग्य मानसशास्त्र

    मानवी मनोव्यापारांचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो. व्यक्तीचे विचार, भावना आणि दैनंदिन जीवनामध्ये इतरांशी होणार्‍या आंतरक्रिया जेवढ्या व्यापक, परिपक्व आणि प्रगल्भ असू शकतील तेवढे त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर निरोगी आणि निरामय जीवन व्यक्तीच्या वाट्याला येते. मानवाच्या या मनोव्यापारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य आरोग्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात आरोग्य मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. हे अभ्यास केवळ सर्वेक्षण, व्यक्तिवृत्त अभ्यास आणि क्षेत्रीय अभ्यासापुरते मर्यादित राहिले नसून ते प्रायोगिक, सहसंबंधात्मक अभ्यास, जैवरासायनिक व न्यूरोट्रान्समीटर यांच्यामध्ये होणार्‍या बदलांमधील सूक्ष्म निरीक्षणापर्यंत पोहोचले आहेत.
    प्रस्तुत पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची ओळख, शरीर-मन संबंध, आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, ताण आणि साधक वर्तन, ताणाला प्रतिसाद/प्रतिक्रिया, तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक संपर्क वाढविणे, दिर्घकालीन आरोग्य विकृतींशी (जुनाट आजारांशी) निगडीत व्यक्तिगत बाबी, प्रमुख दिर्घकालीन आरोग्य समस्या, प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसार, जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन, आरोग्य प्रसार वर्तन इ. मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.

    Arogya Manasshastra

    Rs.150.00
    Add to cart
  • वैकासिक मानसशास्त्र

    वैकासिक मानसशास्त्र

    वैकासिक मानसशास्त्राची सुरवात ही पहिल्या महायुद्धाच्या काळात झाली. या काळातच बालकांचा आणि किशोरांचा मानसशास्त्रीय मनोव्यापारांचा अभ्यास केला गेला. उत्क्रांतीवादाचे जनक चार्लस डार्विन यांनी अर्भकांच्या वर्तनाचे वैकासिक स्वरूप मांडले. डार्विन यांच्या संशोधनातूनच बालकांच्या वृत्ताला शास्त्रीय स्थान प्राप्त झाले. समायोजनाच्या दृष्टीने सुरवातीला वैकासिक मानसशास्त्रज्ञांनी वयाचा आणि विकासावस्थांचा अभ्यास केला. 19 व्या शतकाच्या शेवटी पाश्चात्य देशांमध्ये विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरवात झाली. मानसशास्त्रामध्ये हालिंगवर्थ, जीन पीयाजे, स्टॅन्ले हॉल, डार्विन, बुहलर, प्रेसी, कार्ल रॉजर्स, अब्राहम मॅस्लो, कोन्राड लॉरेन्झा, ब्रॉनफेन ब्रेनर, अलबर्ट बांडूरा, बी. एफ. स्किनर, जे.बी. वॉटसन, एरिक एरिक्सन, डॉ. सिग्मंड फ्रॉईड यासारख्या अनेकांनी दीर्घ परिश्रम करून आपापले महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध केले. 1970 च्या दशकानंतर मानव विकासासंबंधी विचारप्रवाह अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांमध्ये दृढ झाला.
    प्रस्तुत पुस्तकात जीवनकक्षा दृष्टीकोन, विकासाचे स्वरुप, विकासाचे सिद्धांत, जीवनकक्षा विकास, अनुवंश आणि परिस्थितीजन्य आंतरक्रिया, जन्मपूर्व विकासावस्थेचे घातक घटक आणि धोके, पुनरुत्पादनाची आव्हाने आणि निवड, जन्मपूर्व अवस्थेची गती आणि जन्मप्रक्रिया, नवजात अवस्थेचे मूल्यांकन, शैशावस्थेतील शारीरीक वाढ आणि विकास, कारक, वेदनिक, सांवेदनिक आणि बोधनिक विकास, अध्ययन, स्मृति आणि संकल्पना, भाषा विकास, शारीरिक बदल आणि बोधात्मक बदल, ‘स्व’, भावना आणि नैतिक विकास इ. विविध मुद्द्यांचे सर्वांगिण विवेचन केले आहे.

    Vaikasik Manasshashtra

    Rs.145.00
    Add to cart