भूगोल हा विषय तसा गतिमान असून तो निरीक्षण, अवलोकन आणि कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून असतो. म्हणून असे म्हटले जाते भूगोल हा विषय पायाने डोक्यापेक्षा अधिक समजतो, उघड्या डोळ्यांनी केलेली निरीक्षणे अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी शिकवतात. भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे ज्ञान आवश्यक असते किंबहूना भूगोलाच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायचा आपण ज्या प्रदेशात राहतो त्याची इत्यंभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्राचा भूगोल या ग्रंथात महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप, महाराष्ट्राची भौगोलिक रचना, महाराष्ट्राचे हवामान, नदीप्रणाली, महाराष्ट्रातील विविध साधनसंपदा या उपघटकांचा अभ्यास पहिल्या विभागात तर महाराष्ट्रातील शेती, महाराष्ट्रातील लोकसंख्या व वस्ती, महाराष्ट्रातील ग्रामीण विकास व महाराष्ट्रातील पर्यटन या उपघटकांचा समावेश दुसर्या विभागात करण्यात आला आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना सदरील ‘महाराष्ट्राचा भूगोल’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.