आजच्या जागतिकीकरणाच्या काळात बहुतेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा वाढला असून आज पर्यटन ही जागतिक स्तरावरील एक महत्वाची आर्थिक क्रिया बनली आहे. सुरुवातीस उदरनिर्वाह, व्यापार, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा वेगवेगळ्या कारणांनी पर्यटन होत असे. सध्या मौजमजा, विरंगुळा, आनंद तसेच समाधान मिळविण्यासाठी पर्यटन केले जाते. मानवाला निसर्ग सौंदर्य, प्राकृतिक भूरूपे, ऐतिहासिक वास्तू, शिल्पे, धार्मिक स्थळे, उत्सव, शैक्षणिक ठिकाणे, स्मारके, आरोग्यदायी हवामान असे वेगवेगळे घटक आकर्षित करत असतात. मानव अशा आकर्षित करणाऱ्या घटकांना प्रतिसाद देऊन त्या स्थळांना भेट देण्यासाठी प्रवास करतो. या सर्व क्रियेतून त्याला आनंद तसेच समाधान मिळते. एकविसाव्या शतकात जगातील अतिशय वेगाने विकसित होणारा आणि भरपूर उत्पन्न मिळवून देणारा एक उद्योग म्हणून पर्यटन उद्योग विकसित होत आहे. कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाची निर्यात न करता देशाला परकीय चलन मिळवून देणारा पर्यटन हा जगातला एकमेव उद्योग आहे.
Paryatan Bhugol