मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवाला विविध कौशल्ये प्राप्त करावी लागतात. मानवाला जीवनाची कारकिर्द व पेशा सुरू करण्यासाठी, त्याच्याजवळ पात्रता कौशल्ये असणे आवश्यक असते. मनुष्याला पेशा सुरू करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक ज्ञान प्राप्त करावे लागते. त्याशिवाय पेशा सुरू करता येत नाही. व्यवहारिक कौशल्यास व्यक्तीनिष्ठ कौशल्य किंवा अंतर व्यक्तीगत कौशल्य असेही म्हणतात. इतर व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करण्याचा मार्ग तसेच परस्पर संबंध निर्माण करण्याचा मार्ग व्यवहारिक कौशल्य दर्शवित असते. सामाजिक आनंद, संभाषण प्रतिभा, भाषा कौशल्ये, व्यक्तीगत वर्तणूक, बौद्धीक किंवा भावनिक सहानुभूती आणि नेतृत्व वैशिष्ट्ये यांच्याशी व्यवहारी कौशल्याचा संबंध येतो. व्यवहारी कौशल्ये आणि पात्रता कौशल्ये यात फरक आहे. विशिष्ट व्यक्तीला त्याच्या विशिष्ट पेशामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवहारिक कौशल्ये महत्वाची भूमिका बजवित असतात. माहिती व ज्ञानाच्या आधारे कार्यस्थळावर त्या व्यक्तीला श्रेष्ठत्व व महत्व सिद्ध करण्यासाठी व्यवहारी कौशल्ये सहाय्य करीत असतात. सर्वसाधारण कौशल्ये व बुद्धीमत्ताद्वारे नोकरीचा शोध घेणार्या व्यक्तीला उच्च स्पर्धात्मक कार्पोरेट जगात सर्व श्रेष्ठत्व सिद्ध करून देण्यास मदत करीत असते.
सदर पुस्तकात व्यवहारी कौशल्ये विकास याची तोंड ओळख, वेळ व्यवस्थापन कौशल्ये, ताण-तणाव व्यवस्थापन कौशल्ये, समस्या निवारण आणि निर्णय निश्चितीकरण कौशल्ये, समूहकार्य व समूह बांधणी कौशल्ये आणि अध्ययन कौशल्ये संबंधी घटकांवर सविस्तर चर्चा अत्यंत सोप्या प्रभावी भाषेत केलेली आहे. हा ग्रंथ चोखंदळ शिक्षक व विद्यार्थीवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास आहे.
Vyavharik Kaushalye Vikas