-
पुराभिलेखागार
21 व्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरातील सर्व तर्हेची माहिती महाजालामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेली असली तरी जुनी कागदपत्रे जपणारे पुराभिलेखागार आजही महत्वाचे आहेत. पुराभिलेख म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आलेख दर्शविणारी साधने.
इ.स.पू. 327 च्या सुमारास अलेक्झांडरबरोबर भारतात आलेल्या निआर्कसने ‘हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात’ असे लिहून ठेवले आहे. भारतात मध्यकाळापासूनच कागदपत्रे जतन करून ठेवण्याची पध्दत रूढ असल्याचे दिसून येते. पूर्वी संस्थानात कायम सांभाळून ठेवण्याजोगी कागदपत्रे लाल रुमालात बांधत तर पस्तीस, बारा व तीन वर्षे राखून ठेवण्याची कागदपत्रे पांढर्या रुमालात बांधत असत. इ.स. 1818 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली. यावेळी करण्यात येत असलेला सरकारी पत्रव्यवहार, जनतेचे तक्रार अर्ज व इतर कागदपत्रे सरकार दरबारी जमा होऊ लागली.
सदरील पुस्तकात अभिलेखागारविषयक सर्व उपयुक्त माहितीसोबतच मुंबई अभिलेखागार, मुंबई, पुण्याचे पेशवे दफ्तर (पुणे अभिलेखागार) आणि इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथील पुराभिलेखागारांचाही समावेश आहे. ‘डिजिटल अभिलेखागार’ या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थी, शिक्षक व नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल असा विश्वास आहे.Purabhilekhagar
-
भारतातील प्रवास आणि पर्यटन
प्राचीन काळापासून ‘प्रवास’ ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आढळून येते. हळू-हळू मानव उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला, तसतसे त्याचे भ्रमंतीचे उद्देश्य तसेच वाहतूकीची साधनेही बदलत गेलीत. मोटारी, रेल्वे, विमान, जहाज इ. प्रगत व आधुनिक वाहतूकीची साधने उपलब्ध होत गेल्याने जगभर प्रवास करणे सुकर होत गेले. परिणामतः पर्यटन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वपूर्ण आर्थिक उद्योगक्षेत्र म्हणून विकसित झाले. सुक्ष्म नियोजन केल्यास पर्यटन क्षेत्राच्या साहाय्याने देशाचा आर्थिक व एकूणच सर्वांगीण विकास साध्य करणे कठीण नाही. भारतासारख्या भौगोलिक विविधता, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वप्राप्त देशात पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य स्थळे आहेत.
प्रस्तुत पुस्तकात पर्यटनाचा अर्थ, स्वरूप, उद्दिष्ट्ये, प्रकार, भूमिका, नियोजन, वाहतूक साधने, निवास व्यवस्था, मार्गदर्शक या संबंधीचे सचित्र विवेचन सविस्तररित्या केलेले असून भारतातील महत्त्वपूर्ण व निवडक अशा धार्मिक स्थळे, लेण्या, किल्ले, स्मारके इत्यादींची उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे.Bharatatil Pravas And Paryatan