अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन डी रूझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्कांचा जाहीरनामा तयार केला. मानवाधिकार ही संकल्पना फारच विस्तृत आणि व्यापक आहे. ही संकल्पना मुख्यत्वेकरुन विश्वबंधुत्वाच्या भावनेशी निगडीत आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाशी मानव अधिकारांचा घनिष्ठ संबंध असतो. सदरील पुस्तकात मानवी हक्काची संकल्पना, अर्थ, व्याख्या, मानवी हक्क आणि बालक, मानवी हक्क आणि महिला, अल्पसंख्यांक व मानवी हक्क, अनुसूचित जाती-जमाती यांचे हक्क, मानवी हक्कांसाठी शिक्षकाची भूमिका, मानवी हक्क व मूल्यांचे अध्यापनासाठी शिक्षण, मानवी हक्कांचे उल्लंघन अशा महत्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.
अल्पसंख्यांकांचे प्रश्न, सांप्रदायिकता, दहशतवाद, नक्षलवाद, निराश्रितांचे प्रश्न, दारिद्य्र, बेकारी, कुपोषण, एड्स आणि पर्यावरणाचा र्हास अशी मानवी हक्क उल्लंघनाची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. मानवी हक्कांची माहिती सर्वांना व्हावी म्हणून शाळा, महाविद्यालयांमधूनच गांभीर्याने शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठीच सदरील पुस्तकाचे लेखन प्रयोजन.
Manvi Hakka Aani Mulyanche Adhyapan