• भारताचा इतिहास (इ.स.1206 ते इ.स.1526 पर्यंत)

    मध्ययुगीन भारताचे स्थूल मानाने दोन कालखंड गृहीत धरले जातात. एक म्हणजे सुलतान कालखंड व दुसरा मोगल कालखंड. सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपद्धती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. दिल्ली सुलतानशाहीत पाच घराणी होऊन गेली. इब्राहीम लोदी दिल्ली सुलतानशाहीचा शेवटचा सुलतान होय. 21 एप्रिल, 1526 च्या पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले. त्याचबरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट झाली.

    प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथाचा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी, विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चित उपयोग होईल.

    Bhartacha Itihas (1206-1526)

    275.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1205 पर्यंत)

    प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकीयांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्योत्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रियांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

    Bharatacha Itihas (Prambhpasun Te CE 1205 Paryant)

    395.00
    Add to cart