महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कापूस पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच जिल्ह्यात कापसाचे उत्पादन होते. सर्वच जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योग आहेत. या उद्योगाचा कल सामान्यतः विकेंद्रीकरणाकडे आहे. महाराष्ट्रातील या उद्योगधंद्यामुळे विशेषतः ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण होत आहे. हा उद्योग श्रमप्रधान आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्यास मदत होत आहे. तसेच शहरात होणार्या लोकांच्या स्थलांतराला या उद्योगामुळे काहीअंशी आळा बसतो. या उद्योगात एकाच वेळी अनेक क्षेत्राचा विकास होतो. यात स्थानिक साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. वेळ, श्रम, पैसा वाचतो म्हणून या उद्योगाला अतिशय महत्त्व आहे.
या कारखान्यांचा पूर्वइतिहास पाहता, ब्रिटिशकाळापासून हे कारखाने महाराष्ट्रात स्थापन झाले आहेत. अनेकदा हे कारखाने सुरू झालेत आणि बंद पडले आहेत. भविष्यात महाराष्ट्रातील कापूस प्रक्रिया उद्योगाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे. या पुस्तकाचा वाचकाबरोबर सरकार, संशोधक, उद्योजक, कापूस उत्पादक शेतकरी, तसेच या उद्योगावर आधारित पूरक उद्योगधंद्यातील उद्योजक यांना उपयोग होणार आहे. भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत शेतीवर आधारित असलेल्या उद्योगांच्या प्रगतीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
अतिशय सोपी भाषा, स्थानिक भाषा व संकल्पनांचा वापर, आलेख, तक्ते, नकाशे, फोटो यांचा वापर केल्यामुळे हे पुस्तक समजण्यास सोपे झालेले आहे. लेखकाने क्षेत्र भेटी देऊन गोळा केलेली माहिती व आकडेवारीच्या साहाय्याने केलेले विश्लेषण वास्तव परिस्थितीचे दर्शन घडविते. अत्यंत मेहनत घेवून तयार केलेले हे पुस्तक कापूस उद्योगास तसेच अर्थशास्त्राच्या अभ्यासकास उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
Kapus Prakriya Udyog