मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करुन घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जेा परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास द्धि असतो, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो रुढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसर्याच्या शिकवणीने वागत नाही, कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवीत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता, त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरुन जात नाही, दुसर्याच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Manvi Hakk Sadhasthiti ani Avahane