• प्रात्यक्षिक भूगोल

    पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणार्‍या अनेक घटनांबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. प्राचीन काळापासून ग्रीक व रोमन भूगोलकारांनी भौगोलिक ज्ञानाचा प्रसार केला. मध्ययुगीन काळात भूगोलाची पिछेहाट झाल्याने त्यास ‘अंधारयुग’ असे संबोधले जाते. 15 व्या शतकाच्या अखेरीस धाडसी प्रवाशी आणि योद्धा मोहिमेवर निघाल्याने नविन भूप्रदेशाची माहिती मिळू लागली. कालांतराने 18 व्या व 19 व्या शतकात जर्मन शास्त्रज्ञ अलेक्झांडर, हंबोल्ट, कार्ल रिटर, रॅटझेल त्याचप्रमाणे फान्स, अमेरिकन शास्त्रज्ञ व्हि दाल द ब्लाश, कुमारी एलन सेंपल इ. शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या अनेक शाखा विकसित केल्याने उत्तरोत्तर त्यात वाढ होत गेली. आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वतंत्र अस्तित्व असणारी प्रमुख शाखा आहे.
    प्रस्तुत पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी जास्तीत जास्त आकृत्या व नकाशांनुसार स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केल्याने प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना व वाचकांना निश्चित उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

    Pratyakshik Bhugol

    175.00
    Add to cart
  • प्रात्यक्षिक भूगोल – II

    आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वंतत्र अस्तीत्व असणारी प्रमुख शाखा आहे. पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणाऱ्या अनेक घटनाबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. प्राचीन काळापासून ग्रीक व रोमन भूगोलकारांनी भौगोलीक ज्ञानाचा प्रसार केला. मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कांट या जर्मन तत्ववेत्याच्या भौगोलिक विचारांचा विशेष प्रभाव दिसून आला. त्याचप्रमाणे बफन व बूचर यांचेही भौगोलिक विचारांचे योगदान महत्वाचे ठरले. कालांतराने अठराव्या-एकोणाविसाव्या शतकात भूगोलकारांनी भूगोलाच्या विकासात वैज्ञानिक पद्धतीने सहभाग घेतला. सहाजिकच भूगोलाच्या अभ्यासात वाढ होत जाऊन भूगोलाच्या विस्तारात वाढ होत गेली. त्याचप्रमाणे पृथ्वीगोलावरील असलेली वेगवेगळी स्थळे, भूरूपे, वस्त्या, त्याच्यातील अंतरे, त्याचा आकार, विस्तार, त्या स्थळाची लांबी व रूंदी, प्राकृतिक व सांस्कृतिक सांकेतिक चिन्हे, इत्यादीची मोजमाप करत असतांना त्यातूनच प्रात्यक्षिक भूगोलाचा उगम होवून विस्तार होत गेला. प्रस्तुत पुस्तकात प्रत्येक घटकांचा ऊहापोह साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केल्याने विषय समजण्यास मदत होईल. आवश्यक तेथे आकृत्या व माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याने प्रात्यक्षिक भूगोलाचे ज्ञान व आकलन सहजतेने होईल.

    Pratyakshik Bhugol

    295.00
    Add to cart