अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा असून त्या पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय. शाश्वत विकासात चैनीच्या गरजा अंतर्भूत नसतात. शाश्वत विकासाची संकल्पना व्यापक असून त्यात सर्व व्यक्तींच्या कल्याणाची कल्पना अभिप्रेत आहे. या शाश्वत विकासात केवळ वर्तमान पिढीचे कल्याण नसून भावी पिढ्यांच्या कल्याणाकरिता नियोजन व व्यवस्थापनसुद्धा अंतर्भूत आहे. विकासाची पद्धत अशी असली पाहिजे की, तिच्यामुळे भावी पिढ्यांच्या गरजा भागविणार्या क्षमतेस ठेच पोहचायला नको; तर ती अबाधित राहिली पाहिजे. त्या क्षमतेस धोका निर्माण होता कामा नये. वर्तमान काळातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करताना भावी पिढ्यांच्या गरजांकडे लक्ष ठेवून उपयुक्त साधनसंपदा त्यांच्यापर्यंत कशी अबाधित राहिल याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. असा विकास म्हणजेच शाश्वत विकास होय.
Shashwatata and Vikas