• आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास

    ‘आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास’ या पुस्तक शासनाची एखादी योजना अभ्यासणे, योजनेचा लाभार्थ्यांवर झालेला सर्वांगीण परिणामांचा अभ्यास करणे ही खरोखरच भूषणावह बाब असून इतर संशोधकही शासकीय योजनांचे सर्वंकष मुल्यमापन करतील ही अपेक्षा. इंदिरा आवास योजनेचे सर्वाधिक लाभार्थी हे ग्रामीण भागात राहणारे दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लोक आहेत. या योजनेमुळे या समुदायातील लाभार्थ्यांवर काय परिणाम झाला? ह्या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक जीवनात घरकुल योजनेमुळे कश्या पध्दतीने परिवर्तन घडून आले याबाबतची माहिती पुस्तकात दिलेली आहे.

    इंदिरा आवास योजनेबाबतची लाभार्थ्यांची मते, योजना अधिक पारदर्शक बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी सांगितलेल्या सुचना, आवास योजनेचा लाभ मिळवतांना आलेल्या अडचणी आणि आवास योजना अधिक पारदर्शक आणि सक्षम बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी मांडलेली मते तसेच अनुसुचित जाती/जमातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्या, वैशिष्ट्ये याबाबतीत केलेला सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास, आवास योजनेचे महत्त्व, आवश्यकता यांचादेखील यथायोग्य समावेश केला आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणामी आर्थिक विकास झालेला दिसून येत आहे. तरीदेखील आवास योजनेचा प्रचार, प्रसार आणि योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी, आवश्यकता असल्याचे दिसून येते. विविध संशोधक, विविध अहवाल, संदर्भग्रंथ यांची आवास योजनेबद्दलची मते संदर्भ साहित्य म्हणून देण्यात आलेली आहेत.

    Awas Yojana Aani Anusuchit Jati v Jamatincha Vikas

    250.00
    Add to cart
  • लोकसहभाग आणि पी.आर.ए.

    लोकसहभाग हा आजच्या काळातील परवलीचा शब्द बनला आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंतचा बारकाईने विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की, सर्वच लहान मोठी विकासाची असो अथवा विघातक स्वरूपाची असो कामे ही लोकसहभागातून झालेली आहेत. लोकांनी जर एखादे काम मनावर घेतले तर ते सांघिक प्रयत्नातून लिलया करू शकतात. लोकसहभाग म्हणजे एकीची शक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असते. लोकसहभागात्मक विकास कार्यात लोकांच्या वेळ, श्रम, पैसा, बुद्धी आणि उपलब्ध संसाधनांचा सुरेख संगम असतो आणि म्हणून आज सर्व स्तरावरील विकासात्मक उपक्रमासाठी लोकसहभागाची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे. सदर पुस्तकात लोकसहभागाचा अर्थ, संकल्पना, व्याख्या, लोकसहभागाकरीता अपेक्षीत कृती योजना, लोकसहभागाच्या संकल्पनेतून झालेले अपेक्षीत परिवर्तन, लोकसहभागाचे प्रकार, लोकसहभागातील अडथळे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय लोकसहभागात्मक मार्गाची आवश्यकता, लोकसहभागात्मक मार्गाचे फायदे, लोकसहभागात्मक मार्गातून प्रश्न सोडविण्याची पद्धत इ. विषयक बाबींवर देखील प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

    Loksahbhag Aani P.R.A.

    250.00
    Add to cart
  • व्यक्तिसह- कार्य

    मुल्ये मानवतावादावर, मानवधिकाराच्या संकल्पनेवर आधारीत आहेत. लोकशाही तत्वज्ञानातून समाजकार्याची मूल्ये उदयास आली आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने सुस्थितीत जगले पाहिजे. शोषित, वंचित, पिडीत, अभावग्रस्त कोणीही राहू नये ही त्यामागची भावना आहे. सामाजिक न्यायाची भावना, मानव कल्याणाची भावना यामागे आहे. व्यक्तीसहाय्य कार्याच्या मुल्यांना मानवी संस्कृतीचा व मानव सभ्यतेच्या संकल्पनेचा आधार आहे. व्यक्तीनुसार समाज बनत असल्याने आणि समाजानुसार व्यक्ती वर्तन करीत असल्याने व्यक्तीच्या वर्तनाला, विचारांना, आचारांना, दृष्टीकोनाला सामाजिक वातावरणातील, समाजातील घटना आणि घटक प्रभावित करतात.
    समाजकार्याचे अभ्यासक्रमाचे विषय हे सामाजिक जाणीव व सामाजिक उपयुक्ततेवर आधारलेले असतात. ते सामाजिक गतीशिलतेची व विकासाची आधारशिला असतात. परंतु यातील बहुतांशी पुस्तकं इंग्रजी भाषेत असून मराठी भाषेतील पुस्तकांची संख्या तशी कमीच आहे. ती अडचण दूर करण्याच्या दृष्टीकोनातून एका महत्वाच्या विषयावर अभ्यासपुर्ण लिखाण मांडण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे.

    Vyaktisah-Karya

    295.00
    Add to cart
  • -9%

    व्यावसायिक संदेशवहन

    संदेशवहन ही व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत अव्याहतपणे चालणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. सदरील पुस्तकात विविध गोष्टीचे विवेचन सविस्तरपणे सर्वांना सहज समजेल अशाप्रकारे केलेले आहे. या पुस्तकात संदेशवहन, व्यावसायिक संदेशवहन, संघटनात्मक संदेशवहन, संदेशवहनाचा अर्थ, व्याख्या, प्रभावी संदेशवहनाचा अर्थ, प्रभावी संदेशवहनाची आवश्यकता, व्यावसायिक संदेशवहनाचे महत्व, संदेशवहनाचे घटक, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, संदेशवहन प्रक्रिया, संदेशवहनाची उद्दिष्टे, संदेशवहनातील अडथळे, अडथळामुक्त संदेशवहनाचा मार्ग, प्रभावी संदेशवहनाचे लाभ, संदेशवहनात विकास-सुधारणा मार्ग, संदेशवहनाची तत्वे, संदेशवहनाचे प्रकार, संदेशवहनाच्या पद्धती, संदेशवहनाची माध्यमे, संघटनात्मक संदेशवहन, जनसंपर्क, सार्वजनिक संवाद इ. मुद्द्यांचे विवेचन केले आहे.
    सदरील पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ व समजण्यायोग्य आहे. पुस्तक लिहिताना विविध विद्यापीठांचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून लिखाण केल्यामुळे अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना ते निश्चितच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

    Vyavsayik Sandeshvahan

    Original price was: ₹175.00.Current price is: ₹160.00.
    Add to cart
  • व्यावसायिक समाजकार्य परिचय

    Vyavsayik Samajkarya Parichay

    295.00
    Add to cart
  • समुदाय संघटन

    समुदाय संघटन ही समाजकार्याची महत्वपुर्ण पद्धती आहे. समुदाय संघटन ही समाजकार्याची प्रत्यक्ष पद्धती आहे. कारण याद्वारे सामुहिक स्वरूपाची कृती केली जाते. समुदाय कोणताही असो मग तो नागरी समुदाय असला तरी, तो ग्रामीण समुदाय असला तरी किंवा आदिवासी समुदाय असला तरी त्यात समस्या, प्रश्न असतात. समुदायातील स्वरूपानुसार त्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. लोकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. समुदायाच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी, प्रश्नांची-समस्यांची सोडवणुक करण्यासाठी, प्रश्नांची-समस्यांची सोडवणुक करण्यासाठी समुदायातील लोकांना एकत्र करुन, त्यांच्यात जाणीवजागृती निर्माण करुन त्याचे संघटन केले जाते आणि संघटीत स्वरूपाच्या प्रयत्नातून समुदायाची समस्या-प्रश्न सोडविले जातात. समुदायातील घटकांच्या गरजांची पुर्तता केली जाते. समुदायाचे संघटन करुनच समुदाय विकास शक्य होतो.

    Samuday Sanghatan

     

    250.00
    Add to cart