समाजशास्त्रातील आघाडीचे समाजशास्त्रज्ञ ऑगस्त कॉम्प्ट व हर्बर्ट स्पेन्सर आणि अभिजात परंपरेत येणारे व समाजशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे एपिल दुर्खिम, मॅक्स वेबर, विल्फ्रेडो पॅरेतो, कार्ल मार्क्स या समाजशास्त्रज्ञांच्या अभिजात विचारांची ओळख व्हावी आणि वर्तमानकाळात देखील त्यांचे विचार व सिद्धांत कसे समायोजित ठरणारे आहेत याचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे हा त्या सैद्धांतिक व पद्धतीशास्त्रीय मुद्यावर भर देणारा आहे. जे मुद्दे आघाडीच्या समाजशास्त्रज्ञांच्या अभिजात समाजशास्त्रज्ञांच्या विचाराला चालना व विशिष्ट आकार प्राप्त करुन देण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत तेच मुद्दे समकालीन समाजशास्त्रांच्या वैचारीक मांडणीतून आढळतात. एखाद्या ज्ञानशाखेला विज्ञानाचा अथवा शास्त्राचा दर्जा प्राप्त व्हायचा असेल तर स्वतंत्र्य अभ्यासविषय, पद्धतीशास्त्र व प्रबळ सैद्धांतिक चौकट या अटींची पूर्तता व्हावी लागते. ऑगस्त कॉम्प्ट, हर्बर्ट स्पेन्सर यांसारख्या आघाडीच्या समाजशास्त्रज्ञांच्या लिखाणामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून चर्चेत आले. परंतु समाजशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित करण्यासाठी एकोणिसाव्या शतकातील व विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या कालखंडातील अभिजात विचार परंपरेत येणार्या एपिल दुर्खीम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, विल्फ्रेडो पॅरेतो या समाजशास्त्रज्ञांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रस्तुत पुस्तक हे समाजशास्त्राचे अध्ययन व अध्यपन करणार्या विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Samajik Vicharwant