• निवडक दहा कथा – आशय आणि स्वरूप

    “कथा हा मानवी अभिव्यक्तीचा मूलभूत प्रकार आहे. लोककहाणीच्या परंपरेतून प्रवाहित झालेल्या या अभिव्यक्तीच्या रीतीने आधुनिक काळात स्फुट कथा, लघुकथा, नवकथा, दीर्घकथा, लघुत्तम कथा या लिखित रुपांमधून मराठी कथेने प्रवास केलेला आहे. कथेच्या संरचनेत होत गेलेली ही स्थित्यंतरे समजून घेतानाच हेही ध्यानात घ्यायला हवे की, विशेषत: 1960-70 च्या दशकानंतर जीवनाशयाची विभिन्न रुपे केंद्रस्थानी ठेवून मराठी कथा आकाराला येऊ लागली. समाजवास्तवाच्या अंतरंगात शिक्षण, लोकशाही व्यवस्था आणि सामजिक आंदोलने यांच्या रेट्यामुळे होत गेलेली स्थित्यंतरे विभिन्न समूहस्तरांच्या जीवनजाणिवा लेखनाविष्काराच्या केंद्रस्थानी आणण्यास कारणीभूत ठरली. त्याचाच परिपाक म्हणून दलित, कृषिजन, स्त्रीवादी/स्त्रीकेंद्री, मुस्लिम, आदिवासी, विज्ञान व महानगरीय कथासाहित्याचे प्रवाह गतिमान होत गेले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या प्रवाहांचे प्रातिनिधिक लेखन पोहचविण्याच्या भूमिकेतून सदर अभ्यासक्रमाच्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. खेड्यापाड्यातील युवामनांच्या भावनिक व वैचारिक भरणपोषणाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी कशी उपयुक्त ठरु शकते याचा एक उत्तम नमुना स्वायत्ततेअंतर्गत सिद्ध झालेले सदर पुस्तक प्रस्तुत करते.”

    – आशुतोष पाटील

    Nivadak Daha Katha – Aashay Aani Swarup

    250.00
    Add to cart
  • बा, तथागता! मानवतावादी सौंदर्यशास्त्र

    …तो आवाज
    सातत्याने निनादतो आहे
    अडीच हजार वर्षांपासून
    या पृथ्वीतलावर…
    बोलावतोय प्रत्येकाला
    प्रकाशमान सूर्याचं आवतन देत!

    395.00
    Add to cart