• भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण

    अध्ययन विषय केवळ भारतातंर्गत महत्वाचे आहे, असे नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात एखाद्या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धोरणात्मक भूमिका नेमकी कशी आहे? या संबंधाचे आकलन होण्याच्या दृष्टिने त्या त्या देशाचे शासन आणि राजकारण अभ्यासाच्या दृष्टिने महत्वाचे ठरते. शासनाने केलेले अलिकडील बदल वा परिवर्तने सुद्धा अभ्यासाच्या दृष्टिने उपयुक्त असतात आणि या संदर्भाची वस्तुनिष्ठ माहिती व तिचे मूल्यमापन शासनातंर्गत काही महत्वाच्या विभागाद्वारे केले जाते. वास्तविक पाहता भारताने प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीचा अधिकृत स्विकार केल्यामुळे या संविधानिक चौकटीचा अभ्यास केल्याशिवाय आपणास अन्य राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना नीटपणे अभ्यासता येत नाही म्हणून ‌‘भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण’ अभ्यासणे वा समजून घेणे आजच्या परिप्रेक्ष्यात महत्वाचे आहे.
    ‌‘भारतीय राजकारण’ या विचार प्रवाहाचा अभ्यास अनेक अंगाने करण्याचा प्रयत्न काही राज्यशास्त्रज्ञाने केलेला आहे, 1990 च्या प्रारंभी या संदर्भातून अभ्यास करण्याची नवी पद्धत विकसित झाली. ‌‘राजकीय वर्चस्वाचा’ (Political Domination) अभ्यास, एकपक्षपद्धती, प्रभावी राजकीय नेतृत्व, जागतिकीकरण या संकल्पनाद्वारे भारतीय राजकारणाचा अर्थ व्यापक स्वरूपातून समजून घेण्याचा प्रयत्न झाला. ‌‘मूलभूत राजकीय प्रक्रिया’ (Fundamental Political Process) समजण्याकरिता भारतीय शासन आणि राजकारण उपयोगी ठरेल.

    Bharatiya Ganarajyache Shasan and Rajkaran

    325.00
    Add to cart