• -13%

    Marketing and Advertising

    Original price was: ₹150.00.Current price is: ₹130.00.
    Add to cart
  • आधुनिक जाहिरात तंत्र

    आजच्या स्पर्धाच्या युगात जाहिरात कार्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जाहिरात सेवेला जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील होणारे बदलाचे पडसाद व्यवसायामध्ये दिसून येतात. प्रत्येक उत्पादक आणि व्यावसायिक संस्था आपल्या विक्रय वस्तूंच्या जाहिरातवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतांना दिसून येतात. अलिकडे जाहिरात हा खर्च नसून ती दीर्घकालीन गुंतवणूक समजली जाते. जाहिरातीमध्ये सुरक्षितता, सौंदर्य, आरोग्य, आत्मविश्वास, प्रेम, वात्सल्य, चिंता इ. क्रयप्रेरणांपैकी योग्य खरेदी प्रेरणाव्दारे आवाहन केले जाते. वस्तू व सेवांची माहिती विविध जाहिरातीच्या माध्यमाद्वारे ग्रहकांच्या मनावर आघात करीत असते. आजच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेत, वस्तू किंवा सेवांची विक्री वाढावी बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यासाठी जाहिरात करणे आवश्यक असते.

    Aadhunik Jahirat Tantre

    195.00
    Add to cart
  • आधुनिक विपणन तंत्र

    विपणन हे व्यवसायाचे एक कार्य आहे. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण यामुळे बाजारपेठ क्षेत्र आंतरराष्ट्रीय झाले आहे. बाजारपेठ क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. बाजारपेठेत सर्वत्र असंख्य ग्राहक विखुरलेले असतात. त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा सारख्या नसतात. खरेदीदाराची वर्तणूक एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. प्रमाणित वस्तू जीवन चक्रामध्ये प्रवर्तन, विकास, परिपक्व आणि समाप्ती अशा चार अवस्था आहे. नेटवर्क विपणनात काम करणारे सर्व व्यक्ती एक दुसऱ्यासोबत साखळीसारखे जोडलेले असतात. आज जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मानवी जिवनाच्या विविध क्षेत्रात केला जात आहे. बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या व नाना तऱ्हेच्या आकर्षक वस्तू येऊ लागल्यामुळे स्पर्धेचे स्वरूप तीव्र होऊ लागले. वस्तू आणि सेवेचे विपणन गतीमान करण्यासाठी माहितीचा देवाण-घेवाणासाठी परंपरागत माध्यमाचा वापर न करता आधुनिक माहिती तंत्रज्ञानावर आधारलेल्या सोशल मीडियाचा वापर करतात.

    Andhunik Vipanan Tantre

    235.00
    Add to cart
  • आधुनिक व्यवस्थापनाची तत्त्वे

    Adhunik Vyavasthapanachi Tattve

    275.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन

    Kirkol Vikri Vyavsthapan

    195.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन (भाग 2)

    Kirkol Vikri Vyavsthapan (Bhag 2)

    145.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन सिद्धांत आणि प्रक्रिया

    अंतर्गत व्यापारातील किरकोळ विक्री महत्त्वपूर्ण असा अविभाज्य घटक आहे. उपभोक्त्यांना हवी असलेली वस्तू किंवा सेवा त्यांच्या मागणीनुसार किरकोळ विक्रीद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. किरकोळ विक्रेता वस्तूंची विक्री लहान-लहान प्रमाणात करून एक प्रकारे तुकडे किंवा छोटे भागच विक्री करीत असतो. किरकोळ विक्रेता घाऊक व्यापारी किंवा उत्पादक किंवा वितरक यांच्याकडून वस्तूंची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता यांना पाहिजे त्या प्रमाणात हवी असलेली वस्तू उपलब्ध करवून देत असतो. किरकोळ विक्रेता हा वस्तू वाटप साखळीतील घाऊक विक्रेता आणि अंतिम ग्राहक (उपभोक्ता) यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. किरकोळ विक्रेता हा एखादी कंपनी, अभिकर्ता किंवा संस्था स्वरूपात कार्यरत असू शकतो. सद्य:स्थितीत किरकोळ विक्री ही केवळ दुकानांद्वारेच केली जाते असे नव्हे, तर इंटरनेट, पोस्ट किंवा मार्केटिंगद्वारे केली जाते. वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचे बदलते व आधुनिक स्वरूप विचारात घेऊन सदरील पुस्तकात किरकोळ विक्री, विक्री व्यवस्था, विक्री पध्दती, विक्री व्यवस्थेचा आकृतीबंध, विक्रीचे अर्थशास्त्र, बाजारपेठेचे प्रभागीकरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन, उपभोक्ता वर्तणूक, विक्री विपणन मिश्र, मॉल व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाचा वापर तसेच आधुनिक विचारप्रवाहात ग्राहकानंद, ई-रिटेलिंग अशा विविध विषय व तंत्र याविषयी सविस्तर चर्चा केली आहे.

    Kirkol Vikri Vyavasthapan Siddhant Aani Prakriya

    450.00
    Add to cart
  • जाहिरात तंत्र आणि व्यूहरचना

    मानवी जीवनाशी जाहिरातीचा नेहमी संबंध येतो. मानवाचा जाहिरातीशी संबंध केवळ वस्तू व सेवा यांना प्रसिद्धी देणे तसेच त्यांच्या निवडीला मदत करणे इतका मर्यादित नाही. तर सामाजिक, राजकीय, शासकीय, शैक्षणिक, कृषी अशी विविध क्षेत्रांशी जाहिरातीचा संबंध येतो. आज जाहिरात, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आकर्षक होत आहे. वस्तू व सेवांची माहिती विविध जाहिरातीच्या माध्यमाद्वारे ग्राहकांच्या मान्सशास्त्राचा वापर करुन त्याला वस्तू खरेदी करण्यासाठी डावपेच आखले जातात. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण यामुळे बाजारपेठ क्षेत्र आंतरराष्ट्रीय झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ वस्तू दर्जेदार असणे आवश्यक नाही तर त्याविषयी माहिती परिणामकारकपणे पटवून देणे महत्त्वाचे कार्य जाहिरातीद्वारे केले जाते. या पुस्तकात जाहिरातीची ओळख, जाहिरात माध्यमे, जाहिरातीतील सर्जनशिलता, जाहिरात अंदाजपत्रक, जाहिरात संस्था, जाहिरातीचे नियमन आणि नियंत्रण या घटकांचा समावेश आहे.

    Jahirat Tantra aani Vyuharchna

    175.00
    Add to cart
  • विपणन : प्रणाली आणि व्यूहरचना

    विपणन हे व्यवसायाचे एक कार्य आहे. प्रत्येक व्यवसायाला विपणन हे कार्य करावे लागते. विक्री आणि विपणन या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. उत्पादित वस्तू आणि सेवा अंतिम ग्राहक किंवा उपभोक्त्यापर्यंत पोहचविण्यासाठी अनेक व्यावसायिक कार्ये (खरेदी, एकत्रिकरण, वाहतूक, साठवण, जाहिरात व प्रसिध्दी, विक्री इ.) करावी लागतात; यांचा समावेश विपणनात केला जातो. औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यात यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन केले जाते. बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहक संख्येत होणारी वाढ या अनेक कारणांमुळे विपणनाची विविध कार्ये करावी लागतात. त्यामुळे विपणन संकल्पनेमध्ये बदल होत आहे. विपणन संकल्पनेचा उदय, पणन, विपणी अशा क्रमाने बदल झालेला दिसून येतो.

    सदरील पुस्तकात विपणनाची ओळख, बाजारपेठ विभागीकरण आणि खरेदीदार वर्तन, विपणन मिश्र, वस्तु जीवन चक्र, विपणन रणनिती, सेवा विपणन आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारीत विपणन व्यूहरचनाची ओळख या घटकांवर सविस्तर चर्चा अत्यंत सोप्या शब्दात केलेली आहे.

    Vipanan Pranali Ani Vyuvrachana

    250.00
    Add to cart
  • विपणन आणि जाहिरात

    Vipanan Ani Jahirat

    195.00
    Add to cart
  • व्यवसाय व्यवस्थापन (भाग – 2)

    Vyavasay Vyavasthapan (Part – II)

    185.00
    Add to cart
  • व्यवसाय व्यवस्थापन (भाग 1)

    Vyavasay Vyavasthapan (Bhag 1)

    160.00
    Add to cart
  • व्यवसाय व्यवस्थापन (भाग 2)

    या पुस्तकात व्यवसाय नियंत्रण, नेतृत्व, समन्वय, व्यवसाय पूर्वानूमान व क्रियात्मक संशोधन, उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन आणि संचालन या घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या घटकासंबंधीची सविस्तर माहिती अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत मांडण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. आवश्यक त्याठिकाणी उदाहरणे व तक्ते यांचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिला आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपल्यासारख्या चोखंदळ शिक्षक, अभ्यासक व विद्यार्थी वर्गाच्या अपेक्षा व इच्छा पूर्ण करेल असा, आत्मविश्वास आम्ही मनाशी बाळगून आहोत. या विषयाच्या अध्ययनामुळे व्यवस्थापनशास्त्राच्या उच्चस्तरीय अभ्यासक्रमाशी सांगड साधली जाणार आहे. या पुस्तकाचे लिखाण यु.जी.सी.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात आले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि अन्य जिज्ञासु अभ्यासक या ग्रंथाचे सर्वातोपरी स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.

    Vyavasay Vyavasthapan (Bhag 2)

    175.00
    Add to cart
  • व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे

    खर्‍या अर्थाने व्यवस्थापनाची सुरुवात ही विसाव्या शतकापासूनच मानली जाते. आधुनिक युगात मात्र जीवनाच्या सर्वच क्षेत्रात व्यवस्थापन अत्यावश्यक झाले आहे. व्यवसायाला स्वत:च्या प्रगतीसाठी आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. व्यावसायिक संस्थेची अशी पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संबंधित व्यक्तिसमुहाला मार्गदर्शन करणे, नेतृत्व देणे आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच व्यवस्थापन होय. व्यवसायाची पूर्व नियोजित उद्दिष्ट्ये व्यवस्थापनामुळे साध्य होत असतात. व्यक्तिसमुहाच्या या उद्दिष्ट्यांबरोबर प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक उद्दिष्ट्ये देखील पूर्ण होत असतात. व्यापक अर्थाने व्यवस्थापनाची कार्ये म्हणजेच व्यवस्थापन होय. सदरील पुस्तक विद्यार्थ्यांबरोबर संबंधीत विषय शिक्षक, अभ्यासक, वाचक यांना देखील विशेष उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.

    Vyavsay Vyavsthapanachi Multatve

    195.00
    Add to cart
  • व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे

    ‌‘व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे’ या ग्रंथात व्यवस्थापन संकल्पना- अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, महत्त्व, व्यवस्थापन विचाराधारा किंवा तत्वज्ञान, डॉ. टेलर, हेन्री फेयॉल आणि जॉर्ज एल्टन मेयो यांचे व्यवस्थापन विकासातील योगदान. व्यवसायिक नियोजन – संकल्पना, अर्थ, संज्ञा, स्वरूप, महत्त्व, उद्दिष्ट्ये, व्यवसाय नियोजन प्रक्रियेचे टप्पे. संघटन – संकल्पना, स्वरुप, अर्थ, महत्व, मूलभूत तत्त्वे, संघटन रचनेचे प्रकार. निर्देशन, अभिप्रेरणा आणि समन्वय – संकल्पना, अर्थ, व्याख्या, महत्व, स्वरूप, फायदे, मर्यादा. नियंत्रण – संकल्पना, अर्थ, व्याख्या, महत्त्व, फायदे आणि दोष, नियंत्रणाची तंत्रे आणि साधने, नियंत्रण प्रक्रिया, नेतृत्व-अर्थ, संकल्पना आणि महत्त्व या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.

    Vyavsay Vyavsthapanachi Multatve

    235.00
    Add to cart
  • व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे

    व्यवसाय ही एक व्यापक संकल्पना असून त्यामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन करणे, उपयुक्तता निर्माण करणे आणि पैसा मिळविणे यासाठी केल्या जाणार्‍या मानवी आर्थिक कृतींचा समावेश होतो. व्यवसाय म्हणजे सतत कार्यमग्न राहण्याची स्थिती असून हे कार्य उत्पादन, विनिमय, वितरण व संबंधीत सेवांचे असू शकते. नफा मिळविणे हा व्यवसायाचा प्रमुख उद्देश असतो. त्याबरोबरच समाजाला आवश्यक असणार्‍या वस्तू व सेवांचा मागणीनुसार पुरवठा करुन व्यवसायाद्वारे लोकांच्या गरजा भागविल्या जातात. उद्योग, व्यापार, वाणिज्यविषयक सेवा आणि प्रत्यक्ष सेवा या सर्वांचा व्यवसायात समावेश होतो. व्यवसायाचे वर्गीकरण उद्योग आणि वाणिज्य या दोन प्रमुख भागात केले जाते.

    विषयाशी संबंधीत सखोल पण आवश्यक माहिती मिळावी आणि विद्यापीठीय परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखन करताना अनेक मराठी-इंग्रजी संदर्भ पुस्तके, वेबसाईटस व शोधनिबंधाचा आधार घेतलेला आहे जेणेकरुन विद्यार्थ्यांबरोबर संबंधीत विषय शिक्षक, अभ्यासक, वाचलक यांना देखील सदरील पुस्तक उपयुक्त ठरेल.

    Vyavsay Sanghatneche Multatve

    325.00
    Add to cart
  • व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे

    ‌‘व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे’ या ग्रंथात वाणिज्य व उद्योग -अर्थ, व्याप्ती व उत्क्रांती, भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या, नव्या सहस्त्रकात भारतीय व्यवसाय. व्यवसाय – क्षेत्रे व स्वरूप, प्रकार, असंघटीत व्यवसाय, ई-वाणिज्य आणि ऑनलाईन व्यापार. उद्योजकता विकास – व्याख्या, संकल्पना, उद्योजकतेचे स्वरूप, महत्त्व व कार्ये, वैशिष्ट्ये, सिद्धांत, उद्योजकाचे प्रकार, वर्गीकरण, अभिप्रेरण. नवीन उपक्रम – उपक्रम उभारणीचा निर्णय, व्यावसायिक संधी कल्पनेचा शोध, नवनिर्मिती कर्ता किंवा नावीन्याचा आविष्कार करणाऱ्या उद्योजकाची भूमिका, व्यवसायाची व्यवहार्यता व्यवसायाचा आकार किंवा आकारमान. भारतातील व्यापार व्यवहार व्यवस्था – घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, मॉल विक्री व्यवस्था, स्पेशालिटी स्टोअर्स या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.

    Vyavsay Sanghatanechi Multatve

    385.00
    Add to cart
  • व्यवहार कौशल्ये

    Vyavhar Kaushalye

    195.00
    Add to cart
  • व्यवहारिक कौशल्ये विकास

    मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवाला विविध कौशल्ये प्राप्त करावी लागतात. मानवाला जीवनाची कारकिर्द व पेशा सुरू करण्यासाठी, त्याच्याजवळ पात्रता कौशल्ये असणे आवश्यक असते. मनुष्याला पेशा सुरू करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक ज्ञान प्राप्त करावे लागते. त्याशिवाय पेशा सुरू करता येत नाही. व्यवहारिक कौशल्यास व्यक्तीनिष्ठ कौशल्य किंवा अंतर व्यक्तीगत कौशल्य असेही म्हणतात. इतर व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करण्याचा मार्ग तसेच परस्पर संबंध निर्माण करण्याचा मार्ग व्यवहारिक कौशल्य दर्शवित असते. सामाजिक आनंद, संभाषण प्रतिभा, भाषा कौशल्ये, व्यक्तीगत वर्तणूक, बौद्धीक किंवा भावनिक सहानुभूती आणि नेतृत्व वैशिष्ट्ये यांच्याशी व्यवहारी कौशल्याचा संबंध येतो. व्यवहारी कौशल्ये आणि पात्रता कौशल्ये यात फरक आहे. विशिष्ट व्यक्तीला त्याच्या विशिष्ट पेशामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवहारिक कौशल्ये महत्वाची भूमिका बजवित असतात. माहिती व ज्ञानाच्या आधारे कार्यस्थळावर त्या व्यक्तीला श्रेष्ठत्व व महत्व सिद्ध करण्यासाठी व्यवहारी कौशल्ये सहाय्य करीत असतात. सर्वसाधारण कौशल्ये व बुद्धीमत्ताद्वारे नोकरीचा शोध घेणार्‍या व्यक्तीला उच्च स्पर्धात्मक कार्पोरेट जगात सर्व श्रेष्ठत्व सिद्ध करून देण्यास मदत करीत असते.

    सदर पुस्तकात व्यवहारी कौशल्ये विकास याची तोंड ओळख, वेळ व्यवस्थापन कौशल्ये, ताण-तणाव व्यवस्थापन कौशल्ये, समस्या निवारण आणि निर्णय निश्चितीकरण कौशल्ये, समूहकार्य व समूह बांधणी कौशल्ये आणि अध्ययन कौशल्ये संबंधी घटकांवर सविस्तर चर्चा अत्यंत सोप्या प्रभावी भाषेत केलेली आहे. हा ग्रंथ चोखंदळ शिक्षक व विद्यार्थीवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास आहे.

    Vyavharik Kaushalye Vikas

    135.00
    Add to cart
  • व्यावसायिक कौशल्ये (भाग-2)

    Vyavasayik Kaushalye (Bhag – II)

    175.00
    Add to cart
  • व्यावसायिक व्यवस्थापन (भाग 1)

    Vyavasayik Vyavasthapan (Bhag 1)

    195.00
    Add to cart