• पर्यटन भूगोल

    ‌‘पर्यटन भूगोल’ या पुस्तकाच्या माध्यमातून पर्यटन भूगोलाचे महत्त्व विविध अंगांनी समजून घेता येईल त्यात जगातील विविध स्थानांची भौगोलिक स्थिती, वैशिष्ट्ये, आणि पर्यावरणीय परिस्थिती. पर्यटन क्षेत्राचा विकास केल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना, रोजगाराची संधी आणि त्यामुळे स्थानिक व्यवसायांना मिळणारे प्रोत्साहन. पर्यटनामुळे स्थानिक संस्कृती, परंपरा आणि कला यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होते, कारण पर्यटक स्थानिक सांस्कृतिक आकर्षणांचा अनुभव घेतात. याचबरोबर पर्यटन भूगोलामुळे विविध देशांमधील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होते, ज्यामुळे जागतिक संबंध समजून घेण्यास मदत होते. याशिवाय पर्यटन भूगोलातील अभ्यासाने पर्यटन स्थळांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होते, ज्यामुळे पर्यटन स्थळे सुरक्षित आणि आकर्षक राहतात. या सर्व कारणांमुळे पर्यटन भूगोलाचे महत्त्व व्यापक पातळीवर फायद्याचे ठरते.
    पर्यटन भूगोल या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध विवेचन सोप्या भाषेत केले असून हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक यांनाच उपयुक्त नसून समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त आहे.

    140.00
    Add to cart
  • व्यापारी भूगोल

    Vyapari Bhugol

    175.00
    Add to cart
  • साधनसंपदा भूगोल व पर्यावरण

    साधनसंपदा भूगोल व पर्यावरण हे पुस्तक भूगोल व पर्यावरणाच्या संदर्भात एक सुस्पष्ट व संक्षिप्त मार्गदर्शन आहे. साधनसंपदा, भूगोल व पर्यावरण याबद्दलचे ज्ञान सुलभ आणि सुसंगत भाषेत विद्यार्थ्यांसाठी मांडले गेले आहे. यामध्ये संसाधनांची संकल्पना, वर्गीकरण, संसाधन भूगोलाचा परिचय, वन आणि जल संपदा, भू संपदा, खनिज आणि ऊर्जा संसाधने, मानवी साधनसंपदा, संसाधने आणि आर्थिक विकास तसेच भारत आणि महाराष्ट्रातील विविध संसाधनांचे वितरण आणि उपयोग यावर व्यापक विवेचन करण्यात आले आहे.
    प्रस्तुत पुस्तकात या सर्व घटकांची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक आणि अभ्यासक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल. तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा आणि नेट/सेट परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल.

    225.00
    Add to cart