• आहिरानीन्या पाऊलखुना

    सब्देस्नी ताकद दिसन अहिरानी मायनी, तसज खान्देशी संस्कृतीनी वयख करी देवासाठे…
    चला गड्याहो समदा मिस्नी हातभार लावूत
    आपली अहिरानीनी जगले चटक लाई दिऊत…
    आसं कयकयम्हा सांगनारा प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी ह्या अहिरानी भाषावर जिवथाईन पिरेम करतस. अहिरानी अलिखित साहित्य उजायाम्हा येवो तसज नवा तरुन पोरे आहिरानी लिखता होवोत, हायी तयमयना पोटेज त्यास्नी खान्देश साहित्य संघ नावनं घरन हक्कान इचारपीठ खुलं करेल से. चवफेर व्यक्तीत्वना धनी, खान्देशी संस्कृतीना इतिहासना आभ्यासक, आहिरानी भाषानं लेखन करनारा प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी येस्नी वानीसारखीज लेखनीभी तेज से. साहित्य जगतम्हान लेखक, कवी, गझलकार आनी इतिहास संशोधक म्हनीसन वयख निर्मान करनारा या साहित्यिकनं अहिरानीन्या पाऊल खुना हायी पह्यल पुस्तक वाचकेस्नी भेटले यी राह्यन. ह्याम्हा सदाभाऊस्नी अहिरानीन्या समध्या मुया-डाया उलगडी सांगेल सेत. आहिरानीनं उजाय, अहिरानी लोकवाग्मंय, भाषाना सबद, साहित्य चयवयनी सोनानी खानं खान्देश साहित्यसंघ, माय भाषाना जागर, गावनी जत्रा आसा गनकज मनले भारायी टाकथीन आसा लेख सेत. गरीबी त्यास्नी दखेल से भोगेल से, खेडाना कुनबीस्नी कसी लुट व्हस ते डोयाघायी दखेल से त्यामुये भाऊ म्हनस.
    कोन्ह्या नोटा कोन्हा पयसा, आमना खिसा खालेज ऱ्हातस,
    आशा करतस पोरे प्रगतीनी, पिढ्यान पिढ्या सालेज धरतस
    सदाभाऊनी लिखेल अहिरानी वढीतानी लिखेल नही से. अहिरानी त्या कोयीसन पेयेल सेत, जगेल सेत म्हनिसन भाऊना लेखनम्हा अस्सल गावरानी सबदे, म्हनी, वाकप्रचार जागेजाग पेरेल सेत. भाऊ सोतानी वयख प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी आसी न सांगता अहिरानी भाषिक खेडूत म्हनिसन वयख सांगतस त्यास्नी गझलम्हा त्या सांगतस,
    सर्व जगनी नजरम्हान मी येडाभाना से भाऊ… अहिरानी मन भाषा अन मी खेडाम्हाना से भाऊ.
    प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी येस्ना हाऊ खान्देशना आनी खान्देशी संस्कृतीना ऐतिहासिक पुरावा मांडनारा साहित्यग्रंथ दस्तऐवज ठरी आनी वाचकस्ले नक्कीच आवडी हायी मन्हा आनुभवनी खात्री से.
    डॉ. सदाभाऊ मव्हरे चला, ग्यान मियाडत रहा, वाटत रहा, दिन तुमनाज सेतस!

    – रमेश बोरसे
    जेष्ठ अहिरानी साहित्यिक

    Ahiraninya Paulkhuna

    125.00
    Add to cart
  • घर वावर

    ‌‘घरवावर’ना हाऊ बहर फक्त महाराष्ट्रनी मातीम्हा दरवळी आसं नहीसे, तर आहिरानी भाषाना मानूस जगम्हा जठे कोठे व्हई तठे-तठे हाऊ आस्सल मातीना सुगंध दरवळनार से. कवी/साहित्यिक आनी आहिरानी भाषाना सेवक कार्यकर्ता म्हनीसन मी प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी यास्नाकडे देखस. सुर्यवंशी सुर्यना वंशज शेतस तं जगभर उजेड पडीन ना!
    गाव शिवनी कथा सांगस सदाभाऊ
    घर वावरनं दु:ख मांडस सदाभाऊ
    कवी सदाशिव सुर्यवंशी येस्ले कवितास्नं पूर्न भान से. त्यास्ना जगाम्हाच एक न्यारी धून से, तिले लय से, ताल से आनी पक्का सूर से. कवितास्ना विविधांगी प्रकारले त्यास्नी असा काही तऱ्हे बांधेल से जसा पैठनीना कसदार कलावंत पैठनीमा आपली कला उतरावस आसं वाटत ऱ्हास की, त्या पैठनीमधला मोर आपला घरना ओटावरच नाची ऱ्हायनात. कवी.सदाशिव सुर्यवंशी यास्नी ‌‘घर वावरनी’ हायी कविता काळीजमा नाचस आनी डोयामा साचस. मना लाडका धाकला भाऊ सदाले काळीजभर शुभेच्छा देस आनी संपूर्न संस्कृतीना पट लिखाबद्दल विनम्र सलाम करस!

    – लोककवी प्रशांत मोरे
    मुंबई

    Ghar Vavar

    150.00
    Add to cart
  • माणूस जाळण्याच्या अटीवर

    जाब विचारणे हे मूल्य संघर्षशील माणसांना प्रेरणा देणारे असते. जीवनाचे यथार्थ सत्य जाणून घेण्यासाठी माणसांच्या संघर्षाच्या तळापर्यंत पोहचावं लागतं. सामाजिक सत्याचं सौंदर्य दर्शन आणि माणूसपणाला समजून घेणारं संवेदनशील मन ही काव्यनिर्मितीची नैतिकता आहे.
    प्रा.सदाशिव सुर्यवंशी यांची कविता याच अंगातून वैविध्यांनी वाढीस लागली आहे. जागतिकीकरणात नव्याचे आकलन आणि त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी, त्याला स्वीकारण्याचे धाडस केवळ परिवर्तनप्रवाही विचारांमध्येच आहे. जुन्या पानगळीची कृतज्ञता मनात ठेवून नव्या पालवीचं स्वागत हे सत्यदर्शी, सजग, सृजनात्मक वृत्तीच्या जडणघडणीचे द्योतक आहे.
    धर्माधिष्ठीत रूढी, परंपरांच्या जोखडाखाली अडकून पडलेलं माणूसपण, माता भगिनींवरील अमानवी अत्याचार, जनसामान्यांच्या शोषणाचा, त्यांच्या लढ्याचा, जय-पराजयाचा आणि कृषी संस्कृतीच्या नात्यांमधील घटकाचा धांडोळा डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांच्या अभिव्यक्तीतून ठळकपणे आलेला जाणवतो.
    निसर्गाचं, मानवी हक्कांचं आणि मूल्यांचं होणारं अध:पतन, भोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण, अस्मानी आणि सुलतानी संकटांचं चित्रण मोजक्या शब्दात, नेमका आशय गुंफत संयमित भाषेत मांडला आहे. बोलीच्या वाङ्मयीन सामर्थ्याचा उठाव म्हणजेच ‌‘माणूस जाळण्याच्या अटीवर’ हा काव्याविष्कार.
    मराठी साहित्यात या संग्रहाचं प्रेमपूर्वक स्वागत.

    – नारायण पुरी
    तुळजापूर

    Manus Jalnyachya Ativar

    125.00
    Add to cart