प्रादेशिक संकल्पनाच्या विकासातील महत्वाचा टप्पा म्हणजे 20व्या शतकाचा प्रारंभ होय. या शतकात प्रादेशिक भूगोलांच्या अध्ययनावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला होता. 20 शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्स मधील प्रसिद्ध तज्ज्ञ विदाल-द-ला-ब्लाश, यांनी प्रादेशिक भूगोलाच्या अध्ययनावर लक्ष केंद्रीत करून या शाखेचा विकास घडवून आणला.
प्रादेशिक नियोजनाच्या संदर्भात नियोजन प्रक्रियांचा विचार करताना त्यामध्ये सर्व समावेशक घटकांची एकत्रित मांडणी आवश्यक असते. नियोजनाचा उपयोग वेगवेगळ्या विषयामध्ये अनेक वर्षापासून होत असला तरी प्रादेशिक नियोजन ही संकल्पना मात्र 20व्या शतकात प्रामुख्यान विकसित झालेली संकल्पना होय. सर्व साधारणपणे गेल्या 50 वर्षात जगातील विविध देशांनी सामाजिक व आर्थिक पातळ्यांवर एकत्र येऊन नियोजनाच्या माध्यमातून विकासाच्या संदर्भात विविध योजना तयार करण्यास सुरुवात केलेली दिसते. यातूनच प्रादेशिक नियोजनाची आवश्यकता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रादेशिक योजनाचा उपयोग विकसित व विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
प्रादेशिक नियोजनाची संकल्पना, वैशिष्ट्ये, महत्व, प्रादेशिक नियोजनाचे प्रकार, प्रादेशिक विकास, प्रादेशिक विकासाची आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय निर्देशके, प्रादेशिक विकासाचे सिद्धांत व प्रतिमाने, या सोबतच भारतातील प्रादेशिक नियोजन व विकासाशी संबंधित घटकांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे. निती आयोगाची सखोल माहिती देखील विविध संदर्भांच्या सहाय्याने नमूद करण्यात आली आहे.
Pradeshik Niyojan aani Vikas