• उपयोजित मराठी

    अभ्यासक्रमनिर्मितीप्रक्रिया किंवा प्रत्यक्ष अध्यापनात सहभागी नसणार्‍या सामान्य कुवतीच्या लेखनीबहाद्दरांनी विद्यापीठ अभ्यासक्रमात अंतर्भूत अभ्यासपत्रिकांच्या अनुषंगाने जुजबी टिपणे लिहिणे असे चित्र अगदी नजीकच्या काळापर्यंत उच्च शिक्षणक्षेत्रात दिसत होते आणि आजही ते बदलले आहे असे नाही. अशा व्यापारी मार्गदर्शक खटाटोपाच्या जाळ्यात अभ्यासक विद्यार्थीसुद्धा सहज सापडत होते. परिणामी पदवी स्तरावरील उच्च शिक्षणाचे उद्दिष्टच व्यापकपणे कधी फलद्रूप झाले नाही.
    प्रामाणिक व पदवीचे उद्दिष्ट जाणणार्‍या अभ्यासकाकडून खरेतर अशा अभ्यासक्रमास अथवा अभ्यासपत्रिकेस साहाय्यभूत संदर्भग्रंथांचे लेखन होणे अपेक्षित असते. असे अभ्यासकच अतिसुलभीकरण व अव्याप्तपणा अशा दोषांपासून अलिप्त रहात आपली समज आणि तत्संबंधीचे समकालीन भान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात.
    डॉ. संदीप माळी ह्या विद्यार्थीमित्र अभ्यासकाने उपयोजित मराठी ह्या संदर्भग्रंथात पदवी स्तरावरील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे मूलभूत भान बाळगले आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. डॉ. माळी ह्यांनी ह्या संदर्भग्रंथाच्या रूपाने भाषेच्या उपयोजित अंगाची वस्तुनिष्ठ ओळख करून देत मराठी भाषेचा उपयोजनव्यवहार प्रचलित पारंपरिक व अत्याधुनिक माध्यमांच्या संदर्भात प्रात्यक्षिक व विवेचक अशा दोन्ही अंगाने प्रस्तुत केला आहे. सर्वच विद्यापीठांच्या परिक्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक व भाषिक उपयोजनाची मुळाक्षरे गिरवणार्‍या सर्वांसाठी हा संदर्भग्रंथ उपयुक्त ठरेल ह्यात शंका नाही.

    डॉ. प्रभाकर देसाई
    प्राध्यापक व प्रमुख, मराठी विभाग,
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

    Upyojit Marathi

    110.00
    Add to cart
  • भाषा : लेखनकौशल्य आणि शासनव्यवहार

    बदलत्या काळानुसार जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्येही स्थित्यंतर होत जाते. काही क्षेत्रात हे स्थित्यंतर जलद गतीने होते तर काही क्षेत्रात गरजेनुसार पण धीम्या गतीने होत असते. शिक्षणक्षेत्रातही होत जाणारा बदल यास अपवाद नाही. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर आता कौशल्याधारित शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. तो कालसुसंगत आणि अनिवार्य असाच आहे. भाषा आणि साहित्य या विद्याशाखांत आता आंतरविद्याशाखीय अभ्यासाची गरज वाढू लागली आहे. तिची उपयुक्तताही सर्वमान्य झाली आहे. भाषाव्यवहारात तर लेखनकौशल्याला पर्याय नाही. हे लेखनकौशल्य कोणकोणत्या प्रकारचे असते आणि त्याची बलस्थाने काय असू शकतात याचा परिचय ‌‘भाषाः लेखनकौशल्य आणि शासनव्यवहार’ या ग्रंथात वाचायला मिळतो. विशेषतः मुद्रित माध्यमासाठी आणि त्यातही जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडल्या गेलेल्या वृत्तपत्रासारख्या माध्यमात कोणत्या प्रकारची लेखनकौशल्ये आवश्यक आहेत, त्याचे विवेचन या पुस्तकात आढळते. वृत्तपत्रीय लेख, अग्रलेख, स्तंभ वा सदरलेखन, परीक्षण या लेखनप्रकाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये नव्या पिढीतील अभ्यासक डॉ. संदीप कडू माळी यांनी सहजगत्या उलगडून दाखवली आहेत.
    भाषिक कौशल्यविकास आणि शासनव्यवहार, मराठी राजभाषा अधिनियम यासंबंधी मौलिक माहिती या ग्रंथात वाचायला मिळते. मराठीविषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा परिचय प्रत्येक मराठी भाषकाला असायलाच हवा. त्यासंबंधीचा तपशील माहितीपूर्ण असाच आहे.
    डॉ. संदीप कडू माळी हे बहुश्रूत आणि व्यासंगी प्राध्यापक आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रात जबाबदारीने वावरताना कर्तव्यबुद्धीने परिश्रमपूर्वक कार्यरत राहायला हवे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच या ग्रंथाकडे पाहायला हवे.

    – डॉ. मनोहर जाधव
    प्रमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे-411007

    Bhasha – Lekhankaushalya Aani Shasanvyavhar

    135.00
    Add to cart
  • भाषा आणि कौशल्य विकास

    21 व्या शतकात प्रगत कौशल्ये विकसित होत आहेत. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या व्यावहारिक जीवनातही दिवसेंदिवस अमूलाग्र बदल होत आहेत. संपूर्ण जीवनच जणू आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे. असे असताना आपला मराठी विषय आणि भाषा त्यास अपवाद कशी असेल? या जाणिवेने डॉ. संदीप कडू माळी यांच्या अथक प्रयत्नांतून प्रस्तुत ग्रंथ साकारला गेला. वाङ्मयीन मराठीसह काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठे आणि शैक्षणिक परिघामध्ये सध्या व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचे प्रस्थ वाढलेले आहे, याचे आपण सर्वांनीच स्वागत केले पाहिजे. भाषेच्या संदर्भातील प्रगत कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ प्रेरणादायी ठरेल. याशिवाय प्रशासकीय आणि विविध भाषिक कौशल्ये समजून घेण्यासाठी व उपयोजनासाठी विद्यार्थांना आकलन सुलभ होईल अशा पध्दतीने केलेले हे लेखन भाषा आणि कौशल्ये विकासाच्या संदर्भात दिशादर्शक ठरेल, अशी खात्री आहे.

    – प्रा. डॉ. संदीप विठ्ठलराव सांगळे

    Bhasha Ani Kaushalya Vikas

    125.00
    Add to cart
  • मानसशास्त्राची मूलतत्त्वे आणि प्रयोग

    मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून ओळखले जाते. आधुनिक काळात वर्तनाबरोबर प्रेरणा, भावना, व्यक्तिमत्त्व, वेदन, संवेदन,अध्ययन, स्मरण व विस्मरण आणि बुद्धिमत्ता यासारख्या मानसिक घटकांचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो.या क्रमिक पुस्तकामध्ये आम्ही मानसशास्त्रातील काही प्रमुख घटकांचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मानसशास्त्राचे स्वरूप व उद्दिष्ट्ये, मानसशास्त्राच्या शाखा व करिअर संधी, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धती आणि प्रायोगिक मानसशास्त्राचा इतिहास व त्याची वैशिष्टये. त्याचबरोबर प्रायोगिकीकरणातील समस्येचे महत्त्व, परिवर्त्य व त्यांचे प्रकार, प्रायोगिकीकरणातील अभ्युपगमाचे महत्त्व व प्रयोग आणि प्रायोगिक नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुस्तकाच्या अंतिम टप्यात वेदन व संवेदन, अध्ययन व अध्ययनाचे प्रकार, अभिसंधानाचे प्रयोग, स्मृती व स्मृतीची प्रारूपे आणि विस्मरण व विस्मरणाची कारणे सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे जे विद्यार्थी प्रथमच मानसशास्त्र विषयाचे अध्ययन करणार आहेत त्यांना या क्रमिक पुस्तकातील सर्व संकल्पनांचे आकलन होईल अशा सोप्या भाषेत संकल्पना मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

    135.00
    Add to cart
  • लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन

    ‘लेखनकौशल्य – मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ हा ग्रंथ अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मुद्रितशोधन हे लेखन कौशल्याचे महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना ती भाषासंवर्धन व संरक्षण करणारी महत्त्वाची भाषिक संस्था आहे. प्रस्तुत ग्रंथ यशस्वी, उत्तम मुद्रितशोधक घडविण्यासाठीच्या प्रयत्नांचा महाप्रयत्न आहे. मुद्रितशोधन कौशल्यासाठी आवश्यक ज्ञानाच्या बाजू म्हणजे मुद्रितशोधनाचे स्वरूप, मुद्रितशोधनाचा सातत्यपूर्ण सराव यांचा समावेश या ग्रंथात असल्याने मुद्रितशोधन कौशल्याबाबतचे अ ते ज्ञ म्हणजे हा ग्रंथ होय. मुद्रितशोधनाची प्रक्रिया, विरामचिन्हांचे मुद्रितशोधनातील महत्त्व, अचूक शब्दलेखन, लेखनातल्या चुकांमुळे होणारे अर्थबदल, प्रात्यक्षिकांसाठी भरपूर उतारे ही या ग्रंथाची केवळ जमेचीच बाजू नसून मुद्रितशोधनासंदर्भातला ग्रंथ कसा कमाल स्तरावर पूर्णत्व पावलेला असावा, याची साक्ष देणाराही आहे.
    सर्जनशील लेखनाचे स्वरूप, त्याची अंत: व पृष्ठ स्तरावरून सिद्ध होणारी वैशिष्ट्ये वाचक व अभ्यासकांस अवगत व्हावीत, कथालेखनाची, नाट्यलेखनाची निर्मितिप्रक्रिया नेमकी कशी घडून येते हे त्यांस आकलन व्हावे, या विशुद्ध सारस्वतीय भूमिकेतून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनामागील निर्मितिप्रक्रिया, प्रेरणा, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही, ही मोठी उणीव या ग्रंथाने भरून काढली आहे. सर्जनशील लेखनाची पृथगात्मता, सर्जनशीलतेसंदर्भातील संभावित पैलूंची मीमांसा, भाषेतील सर्जनशीलता, कलावंतांची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता, सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती, सर्जनशील लेखन करताना येणार्‍या अडचणी असा बहुआयामी सर्जनविचार हा ग्रंथ मांडतो.
    भाषा पदवीधरांना रोजगार मिळणे ही बाब भाषा अध्यापनाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यासाठी भाषिक कौशल्ये अवगत असणारा विद्यार्थी घडविणे हे सांस्कृतिक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तत्परतेने पार पाडण्यासाठी डॉ. संदीप माळी आणि प्रा. समाधान पाटील लिखित ‘लेखनकौशल्य : मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ या ग्रंथाचे स्वागत आहे.

    – प्रा.डॉ. फुला बागूल

    Lekhan Kaushalya Mudritshodhan V Sarjanshil Lekhan

    120.00
    Add to cart