भारताची एक ‘वैशिष्ट्यपूर्ण देश’ म्हणून जागतिक पातळीवर ओळख आहे ती विभिन्न पैलूतून. भारतात राहणारे विभिन्न जातीधर्माचे लोक हा त्यापैकीच महत्त्वपूर्ण असा पैलू होय. आदिवासी जमात हीसुद्धा प्रमुख जमात आहे. एकूण लोकसंख्येपैकी त्यांचे प्रमाण 8.5% असून डोंगर-दर्यात, जंगलात राहून आपली संस्कृती त्यांनी आजतागायत टिकवून ठेवलेली आहे. आदिवासी समूह हा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला असून त्यांच्या विभिन्न समस्यासुद्धा आजही कायम आहे. शासन स्तरावरून आदिवासी मुलांना शिक्षण प्रवाहात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहे. सदरील पुस्तकात आश्रमशाळा व आदिवासी हा प्रमुख घटक असून आहार, आरोग्य, स्वास्थ्य, उपाययोजना इत्यादींचे सखोल अध्ययन शास्त्रशुद्धरित्या मुद्देसूदपणे मांडण्यात आले आहे. याचा वाचक, संशोधक तसेच अभ्यासूंना नक्कीच फायदा होईल.
Aadivasinche Shikshan V Aarogya