• विपणन व्यवस्थापन

    विपणन व्यवस्थापनाला वाढते महत्व प्राप्त झालेले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकास व वृद्धी यामध्ये व्यवसायाची महत्वपूर्ण भूमिका आहे आणि व्यवसायासाठी विपणन व्यवस्थापनाची भूमिका सर्वांनीच मान्य केलेली आहे.
    विपणनाची व्याप्ती व्यापक आहे. विपणनाची विविध अंगे जसे सेवा विपणन, ग्रामीण विपणन, आंतरराष्ट्रीय विपणन यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा या पुस्तकाचा हेतू आहे. हे पुस्तक विद्यार्थीकेंद्रीत व अभ्यासकांना उपयुक्त असे आहे. यामध्ये सेवा विपणन, ग्रामीण विपणन व आंतरराष्ट्रीय विपणनाचा अर्थ, व्याख्या, महत्व, विपणन मिश्र, त्याची उपयुक्तता, किमतनिश्चिती प्रक्रिया इ. बाबींचे विस्तृत विवेचन आहे. या संकल्पना समजण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

    Vipanan Vyavsthapan

    225.00
    Add to cart
  • विपणन व्यवस्थापन-II (ग्राहक वर्तणूक)

    आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात विपणन व्यवस्थापनाचे महत्व सर्वमान्य आहे आणि विपणनाचा गाभा म्हणजे ग्राहक होय. अस्तित्वात असलेले आणि संभाव्य ग्राहककेंद्रित असे विपणन धोरण आखावे लागते. त्यासाठी ग्राहक वर्तणूकीला वाढते महत्व प्राप्त झालेले आहे.
    ग्राहक वर्तणूकीची संकल्पना अतिशय व्यापक आहे. ग्राहकांचे मानसशास्त्र, विपणन संदेशवहन आणि ग्राहक वर्तणूकीला प्रभावित करणारे घटक यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा या पुस्तकाचा हेतू आहे. यामध्ये व्यक्तिगत आणि औद्योगिक ग्राहक निर्णय प्रक्रिया, ग्राहक मूल्य, ग्राहकांचे विवध प्रकार, ग्राहक वर्तणूक आणि पर्यावरणीय घटक इ बाबींचे सविस्तर विवेचन दिलेले आहे. त्याचबरोबर खरेदी, विक्री, ग्राहक, उपभोक्ता, मूल्य, किंमत, समाधान, ग्राहक भूमिका यासारख्या संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.

    Vipanan Vyavsthapan – II (Grahak Vartanuk)

    150.00
    Add to cart