सदर पुस्तक एकूण पाच घटकांमध्ये ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि सार्क परिषद यांच्या राजकीय व्यवस्थेचे, घटनेचे व आंतरराष्ट्रीय संबंधच्या प्रयत्नांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात निवडक राज्यघटनेमध्ये ग्रेट ब्रिटन दोन घटकांमध्ये विभागण्यात आले असून ग्रेट ब्रिटनमध्ये 2005, 2010, 2014, 2016 पर्यंत जे महत्वपूर्ण राजकीय बदल झाले त्यास संविधानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचा अंतर्भाव सुरूवातीच्या दोन घटकांमध्ये करण्यात आला. न्यायपालिकेचे स्वतंत्र अस्तित्व, त्यामुळे लॉर्डस सभागृहाच्या कार्यकक्षेवर झालेला परिणाम, लॉर्डस सभेच्या सदस्यांच्या उपस्थिती कक्षेत झालेले महत्वपूर्ण निर्णय आदि मुद्दे घेऊन त्यावर संक्षिप्तपणे चर्चा केली आहे तर पुढच्या दोन घटकांमध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या राज्यघटनेपासून तर तेथील राजकीय व्यवस्थेच्या जडणघडणीच्या बदलत्या परिणामाचा परामर्श घेण्यात आला आहे तर शेवटच्या घटकामध्ये दक्षिण आशियायी देशांनी एकत्रित येऊन विभागीय सहकार्य संघटना स्थापन केली. ज्याची ओळख ङ्गसार्कफ म्हणून आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर झाली आहे. आर्थिकर सहकार्य आणि एक दुसर्यांच्या देशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच इतरही सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक बाबींच्या वाढीसाठी एकत्रिपणे प्रयत्न करण्यासाठी विचार विमर्श, निर्णय आणि करारांसाठी सुरू झालेल्या सार्क संघटनेच्या वाटचालीचा आढावा, सार्कच्या स्थापनेमागील उद्देश कार्यपद्धती आणि स्वरूपाबाबत मांडणी करण्यात आली आहे त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सार्कची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख अभ्यासातून होईल अशी आशा आहे.
Nivadak Sanvidhane ani Antarrashtriya Sanbandha (Britan, Amerika V Sark)