• वेध… निळ्या… विजेचा…

    हे समग्र लेखन वाचनीय नव्हे तर चिंतनीय आहे. ‘समीक्षा’ म्हटली की ती ‘दुर्बोध’ हवीच, असा एक समज मराठी साहित्यात झाला आहे. अलीकडील तरुण समीक्षक तो खोटा ठरवून आस्वादात्मक समीक्षेला सखोल चिंतनाची, तर्कनिष्ठ चिकित्सेची जोड देऊन एक सृजनशील क्रांती मराठी वाङ्मय प्रांतात करीत आहेत.

    डॉ. संजय कांबळे याच पिढीचे समीक्षक आहेत. एका अलिप्ततेतून ते वाङ्मयीन विवेचन करतात. अनेक संदर्भातून आपली मते ठोसपणे मांडतात. त्यात अभिनिवेश किंवा आग्रह कुठेही नाही. एक प्रकारची रुजुता त्यांच्या लेखनात प्रत्ययाला येते. हीच गोष्ट मला आशादायी आणि महत्त्वाची वाटते.

    – प्रा. डॉ. विनोद गायकवाड
    प्रमुख, पत्रकारिता विभाग,
    प्राध्यापक, मराठी विभाग,
    राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव (कर्नाटक)

    Vedh Nilya Vijecha

    150.00
    Add to cart
  • सम्यक समीक्षा

    डॉ. संजय कांबळे हे तिसर्‍या पिढीतील आंबेडकरी साहित्यकारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर पहिल्या व दुसर्‍या पिढीतील आंबेडकरी साहित्यकारांचा प्रभाव पडला हे नाकारता येत नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. कृष्णा किरवले, प्रा. केशव मेश्राम, रा. ग. जाधव इत्यादी मूर्धन्य साहित्यकार, समीक्षकांनी मांडलेले समीक्षणाचे आदर्श, सिद्धांत डोळ्यापुढे ठेवून दुसरी व तिसरी पिढी समीक्षा क्षेत्रात वाटचाल करीत आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी साहित्य तपासण्याचे निकष बदलले पाहिजे असे जे ठासून सांगितले, ते निकष दुसरे तिसरे कोणते नसून विशुद्ध आंबेडकरवादी विचारसरणी होय.
    मानवतावादाची जोपासना, धर्मग्रंथातील कालबाह्य विचारांची चिरफाड, भारतीय संविधानातील मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्नशीलता, बुद्धाच्या प्रज्ञा, शील, करुणेच्या भावतत्वांचे परिशीलन करुन साहित्यनिर्मिती व त्या साहित्यातील गुणावगुणांचे विवेचन ज्या निकषांच्या आधारे करायचे ते सर्व आंबेडकरवादाच्या संकल्पनेत लिहित आहे. हे डोळ्यापुढे ठेवून डॉ. संजय कांबळे यांची लेखन सरपट धावत आहे असे अनेक विचार प्रचोदक लेखन डॉ. संजय कांबळे यांनी लिहून दिशादर्शी व्हावे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो.

    – डॉ. अनिल गजभिये,
    जेष्ठ आंबेडकरीवादी समीक्षक, विचारवंत, इंदूर (मध्यप्रदेश)

    Samyak Samiksha

    150.00
    Add to cart