• आधुनिक बँकिंग प्रणाली

    जगाला बँकिंग व्यवसाय देण्याचे श्रेय इंग्लंडला आहे. इंग्लंडमध्ये तिसर्‍या एडवर्ड राजाने 1304 मध्ये सरकारी बँकर किंवा सराफ नेमले. सुरुवातीला हे बँकर वेगवेगळ्या देशातील नाण्यांचे व्यवहार करीत असत. तसेच स्वत:जवळील पैसे सुध्दा कर्जाऊ देत असत. या व्यवहारातून मिळणार्‍या नफ्याचा काही भाग राजाला द्यावा लागत असे. कालांतराने सोनारांनी लंडनमध्ये हा व्यवसाय सुरु केला. सोनाराजवळ जमा झालेले पैसे बराच काळ पडुन राहत होते, म्हणून त्यांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. ठेवींमध्ये वाढ व्हावी यासाठी ठेवींवर व्याज देणे सुरु केले. हे सर्व व्यवहार पावत्यांवर होवू लागले. सोनारांनी दिलेल्या पावत्या जी व्यक्ती घेऊन येत असे त्यास रक्कम मिळत असे, त्यामुळे त्या पावत्यांना नोटांचे स्वरुप प्राप्त झाले, अशा प्रकारे आधुनिक बँकिंग व्यवहाराचा पाया त्यावेळी घालण्यात आला. पुढे इ.स. 1694 मध्ये इंग्लंडमध्ये विल्यम पॅटर्सनच्या पुढाकाराने बँकाबाबत टनेजचा कायदा पास झाला. या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये ‘दि गव्हर्नस अ‍ॅन्ड दि कंपनी ऑफ बँक ऑफ इंग्लंड’ ही बँक स्थापन झाली.

    सदरील पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून व्यापारी अधिकोष, केंद्रिय अधिकोष, सहकारी बँका आणि नाबार्ड, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष, बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.

    Aadhunik Banking Pranali

    250.00
    Add to cart
  • भारतीय कृषी अर्थव्यवस्था

    कृषी अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राच्या सामान्य सिद्धांतांच्या आधारे कृषी व संबंधित अर्थव्यवहारांचे विश्लेषण करणारे शास्त्र आहे. अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा कृषी क्षेत्रावर देखील प्रभाव पडतो, त्यामुळे कृषी अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला सामान्य अर्थशास्त्राच्या सिद्धांतांची माहिती असणे आवश्यक आहे. हे क्षेत्र संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असून, त्याचा अभ्यास केल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाबद्दल अधिक स्पष्टता मिळते.
    ‌‘भारतीय कृषी अर्थव्यवस्था’ हे पुस्तक भारतीय कृषी अर्थव्यवस्थेवरील विविध घटकांचा अभ्यास करत, अद्ययावत आकडेवारी आणि महत्त्वाच्या विषयांची माहिती प्रदान करते. पुस्तकातील पाच मुख्य घटकांमध्ये कृषी अर्थशास्त्राची ओळख, कृषी उत्पादकता, कृषी सिंचन, कृषी पुरवठा, आणि कृषी विपणन यांचा समावेश आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यास प्रश्न दिले असून, या पुस्तक लेखनासाठी विविध शास्त्रीय संदर्भ, शासकीय अहवाल, शोधनिबंध, आणि इंटरनेटवरील माहितीचा उपयोग करण्यात आलेला आहे.
    प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक आणि जिज्ञासू अभ्यासकांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल.

    250.00
    Add to cart
  • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून यात – 1) महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा परिचय – महाराष्ट्राची भौगोलिक वैशिष्ट्ये, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल, 2) महाराष्ट्राची लोकसंख्या – महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर, महाराष्ट्रातील नागरीकरण, 3) महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था – राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, महाराष्ट्रातील पीक पद्धती व जलसिंचन, शेतीची उत्पादकता, विदर्भाच्या संदर्भात विशेष अध्ययन, 4) महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना – राज्याच्या औद्योगिक विकासाची वैशिष्ट्ये, लघुउद्योग व कृषिआधारीत उद्योग, महाराष्ट्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, महाराष्ट्रातील वाहतुक व्यवस्थेचा विकास, 5) महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र – महाराष्ट्रातील सेवा क्षेत्राची भूमिका आणि कामगिरी, सेवा क्षेत्राचे प्रकार व वर्गीकरण, महत्त्व आणि समस्या, महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग इत्यादींचे विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

    Maharashtrachi Arthvyavstha

    265.00
    Add to cart
  • लोकसंख्याशास्त्र

    लोकसंख्याशास्त्र या पुस्तकाची विभागणी पाच घटकांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या घटकामध्ये लोकसंख्याशास्त्राचा परिचय, दुसर्‍या घटकामध्ये प्रजनन क्षमता आणि मृत्यू व तत्संबधी मापन पद्धती, तिसर्‍या घटकांमध्ये लोकसंख्येचे स्थलांतर, चौथ्या घटकामध्ये लोकसंख्येचे नागरीकरण तर शेवटच्या पाचव्या घटकामध्ये लोकसंख्या आणि विकास व भारतातील पंचवार्षिक योजना काळातील लोकसंख्या धोरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र विषयांतर्गत भारताच्या लोकसंख्या संदर्भांतील घटकाची तयारी करतांना या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरणार आहे.

    Loksankhayashashra

    180.00
    Add to cart