-
कौटिल्याचे अर्थशास्त्र
Rs.175.00‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ या पुस्तकात कौटिल्य अर्थशास्त्राची संकल्पना, कौटिल्य यांची अर्थतज्ज्ञ म्हणून भूमिका, तसेच या ग्रंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विषद करण्यात आली आहे. आदर्श किंवा कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडताना कौटिल्यांची दूरदृष्टी स्पष्ट होते. त्याचबरोबर कौटिल्यकालीन समाजव्यवस्था, सामाजिक जीवन, अर्थव्यवस्था व सात मूलभूत सिद्धांत यांचे विवरण पुस्तकात आहे. या ग्रंथात कौटिल्यांच्या काळातील व्यवसायांचे स्वरूप आणि सार्वजनिक वित्तव्यवस्थेबद्दल त्यांचे विचार, तसेच चलनव्यवस्थेवरील दृष्टिकोन यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्यवसायविषयक विचारांमध्ये शेती, पशुपालन, व्यापार (विशेषतः परकीय व्यापार), व्यापार मार्ग, खाणी, कारखाने आणि विविध उद्योगधंदे यांचा समावेश आहे. कौटिल्यांचे विचार आणि नीती आजच्या युगातही शासकीय धोरण, व्यवस्थापन व आंतरराष्ट्रीय संबंध यांमध्ये मार्गदर्शक ठरतात. कौटिल्यांचा दृष्टिकोन व्यवहारिक, कठोर आणि परिणामाभिमुख होता, जो आजही तितकाच परिणामकारक वाटतो. ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ हे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि प्रशासन या तिन्ही विषयांचा संगम असल्याने हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक व अध्यापक यांच्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल.