भूगोलाच्या अध्ययनात आणि अध्यापनात प्रात्यक्षिक भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रात्यक्षिक भूगोलामध्ये आजूबाजूच्या परिसराचे अवलोकन, निरिक्षण, परिक्षण, सर्वेक्षण महत्त्वाचे असून त्यासाठी अनेक उपयोगी साधनांचा वापर केला जातो. प्रात्यक्षिक भूगोलात आपणास संपूर्ण परिस्थितीचा यथायोग्य अभ्यास करणे शक्य होते. प्रात्यक्षिक भूगोलाद्वारे भूभागाचे निरीक्षण त्याचे स्वरूप, प्रकार, त्याचा मानवी जीवनावरील परिणाम निश्चित केला जातो. भूगोलाचा आत्मा आणि पायाभूत आधार असलेल्या नकाशाची मांडणी, आरेखन, त्याचे प्रत्यक्ष वाचन प्रात्यक्षिक भूगोलातून शक्य असते.
सदरील पुस्तकात नकाशाशास्त्र, नकाशाप्रमाण, दिशा-उपदिशा, उठाव दर्शविण्याच्या पध्दती, नकाशा प्रक्षपणे, सांकेतिक प्रक्षपणे, नकाशा आकार – विस्तार आणि लघुकरण, भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे व त्यांचे वाचन, भारतीय दैनंदिन. हवामानदर्शक नकाशे, सर्वेक्षण, मोजणी, साखळी व टेप सर्वेक्षण, समतल फलक सर्वेक्षण, प्रिझमी कंपास सर्वेक्षण, डम्पी समतलन मोजणी, नतिमापी मोजणीची अन्य उपकरणे, खडकांचा अभ्यास, जागतिक स्थिती पध्दती, सांख्यिकी आकडेवारी, क्षेत्रीय अभ्यास, पर्यटन अहवाल इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा सविस्तर व मुद्देसूदपणे समावेश केला आहे.
Pratyakshik Bhugol