प्रा. डॉ. सावन माणिकराव देशमुख, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग प्रमुख, भारतीय महाविद्यालय, मोर्शी, जि. अमरावती येथे कार्यरत आहे. त्यांना जैवभूगोल व पर्यावरण शास्त्राची विशेष आवड आहे. त्यांच्या अनेक शोधनिबंध पत्रिका प्रकाशित झालेल्या आहेत. ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे भूगोल मार्गदर्शक आहेत.
प्रा. डॉ. सावन माणिकराव देशमुख यांना पर्यावरण पुरस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. वसुंधरा मित्र पुरस्कार किर्लोस्कर वसुंधरा मित्र संस्था, तसेच सर्प संवर्धन पुरस्कार महाराष्ट्र राज्य सर्प मित्र संघटना इत्यादीद्वारे प्राप्त झालेले आहेत. अलिकडेच त्यांना महाराष्ट्र शासनाद्वारे मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ते महाराष्ट्र भूगोल शास्त्र परिषद, पुणे, डेक्कन भूगोल संस्था, पुणे. तसेच Indian Science Congress इत्यादींचे आजिव सदस्य असून सध्या ISC चे अमरावती विभागाचे मानद सदस्य आहेत. त्याचप्रमाणे ते ”Center for Animals Rescue and Study’ (CARS) आणि ”People for Animals’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच त्यांना खेळाची सुद्धा खुप आवड आहे. त्यांनी राष्ट्रीय तसेच विद्यापीठ स्तरावर सॉफ्टबॉल, बेसबॉल आणि तलवारबाजी या खेळात सहभाग घेतलेला आहे. प्रतीवर्षी वन्यजीव संवर्धन तसेच पर्यावरण संवर्धन या संबंधित शिबिरांचे आयोजन करतात. त्यांची वन्यजीव व पर्यावरण विषयक आवड, अनुभव व अध्ययनशिलता म्हणून हे पुस्तक आपल्या करिता सादर करित आहे.
Melghat Pradeshatil JaivaVividhata