पालक बनणे हे व्यक्तीच्या जीवनात खूप आनंद देणारी बाब आहे, तरी पालकत्वाची जबाबदारी पार पाडणे तेवढीच कठीण आहे. आपल्या बालकाला वाढवणे, त्याच्या योग्य विकासाला दिशा देणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. आपल्या मुलांसोबत चांगला संवाद असणे आजच्या इंटरनेटच्या युगात दुरापास्त झाले आहे. पालक अशिक्षित असो वा सुशिक्षित, गरीब वा श्रीमंत सर्वांना आपापल्या बालकांविषयी काही ना काही समस्या, शंका जाणवतात. या शंका कशा दूर कराव्यात. समस्या कशा सोडवाव्यात हे कोणत्याही स्तरावरील शिक्षणात शिकवले जात नाही. कारण पालकत्व ही नैसर्गिक गोष्ट मानली जाते.
पालकत्वाचे शिक्षण ही संकल्पना भारतीयांसाठी नवीन आहे. पाश्चात्य देशात या शिक्षणाची मुळे रूजली आहेत. भारतात परंपरेने कुटुंबाकडून बालकाचे संगोपन, शिस्त, त्याचे भविष्य याविषयी निर्णय घेतले जातात. इथेच पिढीतील अंतराची ठिणगी पडते. बालहक्कांची घुसमट होते, हे सर्व होवू नये म्हणून पालकत्व शिक्षणाची रूजवात भारतात झाली.
प्रस्तुत पुस्तकात पालकत्व शिक्षण संकल्पना, अर्थ, गरज, महत्व, व्याप्ती, पालक शिक्षणाचे विविध दृष्टिकोन, विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले उपागम, पालकांची भूमिका, जबाबदार्या यांचे तपशीलवार विवेचन केलेले आहे. भारतातील समाजात अस्तित्वात असलेल्या विविध कुटुंबातील आंतरक्रिया बालकांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, भारतातील पालक शिक्षण, पालकत्व शैली, पालकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा बालकावर होणारा परिणाम या बाबी नवीन नसल्या तरी त्यांची मांडणी पालक, शिक्षणाच्या दृष्टीने करण्यात आली आहे.
Palakatv Shikshan