पृथ्वी व पृथ्वीवरील विविध घटकांशी भूगोलाचा संबंध आहे. भूगोलाच्या अभ्यासात मानवाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विषयाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत गेले. भारतातील तसेच जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे अलीकडील काळात लोकसंख्या वाढ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कारण लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणार्या गंभीर परिणामांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. लोकसंख्या हा घटक कोणत्याही देशाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असतो. कारण देशाचे आकारमान, वैशिष्ट्ये, विभाजन, रचना, राहणीमान, प्रगती, विकास, सामाजिक रचना हे घटक लोकसंख्येमुळे प्रभावित होत असतात.
प्रस्तुत पुस्तकात भारताची जनगणना, लोकसंख्येच्या सर्वेक्षणाच्या पद्धती, लोकसंख्याविषयक मिळालेल्या आकडेवारीचे सादरीकरण, लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक, स्थलांतर, लोकसंख्येचा मनोरा, वयोगट रचना, व्यवसाय संरचना, अवलंबता गुणोत्तर, दीर्घायुष्य, अपेक्षित आयुर्मान, लोकसंख्या सिद्धांत, लोकसंख्या विषयक समस्या, लोकसंख्या धोरणे, मानव विकास निर्देशांक, आरोग्य निर्देशांक तसेच नागरीकरण व त्यासंबंधित समस्या इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.
Loksankhya Bhugol