• आधुनिक राजकीय विचारप्रणाली

    Adhunik Rajkiya Vicharpranali

    195.00
    Read more
  • राजकीय विचारप्रणाली

    आधुनिक राजकीय चिंतनात विचारप्रणाली ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानण्यात येते. विचारप्रणालीच्या आधारावर राजकीय व्यवस्थेला अधिमान्यता मिळत असते. मध्ययुगात व औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या ज्या नवीन समस्या किंवा प्रश्नांची उत्तरे धर्म देऊ शकला नाही त्यांची उत्तरे विचारप्रणालींनी दिली. राजकीय सहभागाची व्यापकता जसजशी वाढत गेली तसे विचारप्रणालीचे महत्व वाढले. विचारप्रणालीच्या आधारे समाजात पसंतीच्या स्वरूपाची राजकीय व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. विचारप्रणालीमुळे राज्याचे स्वरूप निश्चित होत असते. भारताने समता, स्वातंत्र्य, यावर आधारीत असलेली आणि जातपातविरहीत लोकशाहीचा स्विकार केला असला तरी प्रत्यक्षात पूर्ण समता, पूर्ण स्वातंत्र्य कुठेच आढळून येत नाही. कोणतीही विचारप्रणाली ही एकात्म स्वरूपाची किंवा अंतरिक दृष्टीने सुसंगत नसते. कारण ती स्थिर स्वरूपाची नाही.
    प्रस्तुत ग्रंथात वचारप्रणालीची भूमिका, वैशिष्ट्ये, राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय वाद, विश्वराज्य, लोकशाही समाजवाद, भारतातील लोकशाही समाजवादाचा उदय व विकास, मार्क्स, म. ज्योतीबा फुले व डॉ. आंबेडकर यांचे विचार, संसदीय शासनपद्धती, स्त्री चळवळ, भारतातील स्वीवाद, जात आणि पितृसत्ताक इ. विविधांगी मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले आहे.

    Rajkiya Vicharpranali

    275.00
    Add to cart
  • राजकीय समाजशास्त्र

    जगातील अनेक देशांमध्ये विज्ञान युग आणि त्यासोबत आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक बदल घडुन आले. आर्थिक, सामाजिक आणि परिणामतः राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची लाट आली. सामाजिक बदल हा प्रामुख्याने आर्थिक चळवळी आणि राजकीय जनजागृती या क्षेत्रातुन प्रगट होत गेला. राष्ट्रभावना प्रखर होत गेली. प्रस्थापित साम्राज्यवादी सत्ता त्यांची वसाहतवादी राज्ये, यांच्यात वाद निर्माण होऊन महायुद्धे उद्भवली. प्रथमतः पहिल्या महायुद्धानंतर युरोपचा राजकीय आणि आर्थिक नकाशाच बदलुन गेला. दुसर्‍या महायुद्धानंतर आफ्रिका व आशिया खंडातील नवोदीत राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. प्रस्थापित किंवा परंपरागत राजकीय संकल्पना आणि व्यवस्था या क्षेत्रात संपुर्ण क्रांती झाली. नवोदीत, नवनिर्माण राज्यांनी जरी परंपरागत राजकीय संकल्पना किंवा व्यवस्था यातील काही बाबी कमी-जास्त प्रमाणात स्विकारल्या तरी त्यांच्या समाजातील सांस्कृतीकरणाची तसेच सामाजीकरणाची अवस्था, आर्थिक स्थिती आणि समस्या व त्यांच्या राजकीय समाजाच्या, राज्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व ध्येये यानुसार त्यांच्या राजकीय आचारविचारांची जडणघडण होऊ लागली.

    Rajkiya Samajshastra

    225.00
    Add to cart