भारतीय अर्थव्यवस्था (भाग 3 व 4) या पुस्तकातील भाग-3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील पंचवार्षिक नियोजन, 12 वी पंचवार्षिक योजनांचे यश-अपयश, नीती आयोग, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वैशिष्टे, सहकार चळवळ, प्रादेशिक असमतोल, जलव्यवस्थापन इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तर भाग-4 मध्ये तसेच दारिद्य्राच्या संकल्पना, कारणे, बेरोजगारी प्रकार कारणे, दारिद्रय निर्मूलनाचे उपाय व बेरोजगारी निर्मूलनाचे उपाय इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तसेच यात प्रात्यक्षिक सबंधित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी मार्गदर्शक तत्वे, प्रात्यक्षिक लिखाण नमुना प्रात्यक्षिके दिलेली असून सोबतच प्रात्यक्षिक गुण विभागणी दिलेली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकनाचा नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.