• निवडक राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध (ब्रिटन, अमेरिका व सार्क)

    सदर पुस्तक एकूण पाच घटकांमध्ये ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि सार्क परिषद यांच्या राजकीय व्यवस्थेचे, घटनेचे व आंतरराष्ट्रीय संबंधच्या प्रयत्नांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात निवडक राज्यघटनेमध्ये ग्रेट ब्रिटन दोन घटकांमध्ये विभागण्यात आले असून ग्रेट ब्रिटनमध्ये 2005, 2010, 2014, 2016 पर्यंत जे महत्वपूर्ण राजकीय बदल झाले त्यास संविधानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचा अंतर्भाव सुरूवातीच्या दोन घटकांमध्ये करण्यात आला. न्यायपालिकेचे स्वतंत्र अस्तित्व, त्यामुळे लॉर्डस सभागृहाच्या कार्यकक्षेवर झालेला परिणाम, लॉर्डस सभेच्या सदस्यांच्या उपस्थिती कक्षेत झालेले महत्वपूर्ण निर्णय आदि मुद्दे घेऊन त्यावर संक्षिप्तपणे चर्चा केली आहे तर पुढच्या दोन घटकांमध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या राज्यघटनेपासून तर तेथील राजकीय व्यवस्थेच्या जडणघडणीच्या बदलत्या परिणामाचा परामर्श घेण्यात आला आहे तर शेवटच्या घटकामध्ये दक्षिण आशियायी देशांनी एकत्रित येऊन विभागीय सहकार्य संघटना स्थापन केली. ज्याची ओळख ङ्गसार्कफ म्हणून आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर झाली आहे. आर्थिकर सहकार्य आणि एक दुसर्‍यांच्या देशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच इतरही सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक बाबींच्या वाढीसाठी एकत्रिपणे प्रयत्न करण्यासाठी विचार विमर्श, निर्णय आणि करारांसाठी सुरू झालेल्या सार्क संघटनेच्या वाटचालीचा आढावा, सार्कच्या स्थापनेमागील उद्देश कार्यपद्धती आणि स्वरूपाबाबत मांडणी करण्यात आली आहे त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सार्कची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख अभ्यासातून होईल अशी आशा आहे.

    Nivadak Sanvidhane ani Antarrashtriya Sanbandha (Britan, Amerika V Sark)

    150.00
    Add to cart
  • भारतीय संविधानातील तरतूदी आणि स्थानिक स्वराज्य संस्था

    कोणत्याही देशाच्या संविधानाच्या स्वरुपावर त्या देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक तथा आर्थिक या सारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो. देशाअंतर्गत या घटकाप्रमाणेच अन्य देशातील काही घडामोडी, विचारप्रणाली, अस्तित्त्वात असलेली संविधाने इत्यादी घटकांचाही प्रभाव पडतो. भारताचे संविधान घटना समितीद्वारा निश्चित काळात तयार केले गेले. भारतीय संविधानाचे स्वरुप 395 कलमे, 22 प्रकरणे व 08 परिशिष्ट्ये मिळून लिखित स्वरुपात तयार करण्यात आले. भारतीय संविधानाचा विचार करता संविधान दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या 3 पद्धतीचा उल्लेख केला आहे. संविधानकर्त्यांनी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी राज्याचे धोरण अत्यंत महत्त्वाचे असते. राज्यकारभाराच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हे राज्यकर्त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य असते. भारतीय राजकीय व्यवस्थेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच लोकसभा व राज्यसभा यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

    प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधान, उद्देशपत्रिका, राज्य नितीची मार्गदर्शक तत्त्वे, घटनात्मक पदे व त्यांची विविध कार्ये, लोकसभा, राज्यसभा, संसद सदस्य, न्यायालय, निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, घटकराज्याचे विधिमंडळ, कायदा निर्मितीची प्रक्रिया, पंचायतराज, केंद्र शासनाशी संबंधित समित्या, मूल्यमापन समित्या, ग्रामसभा व महिलांचा सहभाग, संयुक्त महाराष्ट्र व नागपूर करार, माहितीचा अधिकार इ. बाबींचे अभ्यासपूर्ण व तपशीलवार विश्लेषण करण्यात आले आहे.

    Bharatiya Sanvidhanatil Tartudi Aani Sthanik Swarajya Sanstha

    375.00
    Add to cart