समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नाही, तर उपयुक्ततावादी शास्त्र सुद्धा आहे. त्यामुळे समाजशास्त्राचे अभ्यासक विविध क्षेत्रांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊ शकतात.
प्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती याबरोबरच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन दिली आहे. यामध्ये समाजशास्त्राची उपयोगिता, समाजशास्त्र आणि सामाजिक परिवर्तन, संस्कृतीच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, घटक आणि कार्य, तसेच सामाजिकरणाचे अर्थ, व्याख्या, मूलतत्त्वे, उद्दिष्टे, अवस्था, साधने आणि सिद्धांत यांची माहिती समाविष्ट आहे.
याशिवाय, सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता, यांचे अर्थ, प्रकार, घटक, स्तरीकरणाची कार्ये, सामाजिक गतिशीलतेचे परिणाम आणि प्रोत्साहन करणारे घटक यावर सुद्धा चर्चा केली आहे. सामाजिक परिवर्तनाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार आणि कारणे यांची सुद्धा माहिती या ग्रंथात दिली आहे.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक आणि जिज्ञासू अभ्यासकांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल.