• कॉर्पोरेट कम्युनिकेशन

    ‘कॉर्पोरेट संवाद’ ही संकल्पना उद्योग विश्वाच्या वाढत्या गरजेतून निर्माण झाली आहे. उत्तम संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी संवादाचे तंत्र वापरावे लागते. दिवसागणिक माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र विस्तारत आहे. या विस्तारात संज्ञापनाचे प्रारुपही बदलत आहे. उत्तम संज्ञापनासाठी प्रभावी माध्यम हे सूत्र अनिवार्य झाले आहे. यातूनच कार्पोरेट संवादाची संकल्पना उदयास आली. जनसंपर्क अधिक प्रभावी करण्यासाठी संज्ञापनाची व्यूहरचना प्रगत करणे आणि त्यासाठी आधुनिक माध्यमांचा वापर करणे काळाची गरज आहे. कार्पोरेट जगताचा भर अचूकता, तत्परता, कार्यशिलता, गुणवाा यावर अधिक असतो वाढते प्रतिस्पर्धी मागे टाकून बाजारपेठेत नावलौकिक मिविण्याचा त्यांचा अट्टहास असतो. या करिता चूक संज्ञापनाची रचना महत्वपूर्ण आहे. ही रचना केवळ परंपरागत पद्धतीच्या जनसंपर्क शास्त्र अवलंबून चालणारी नाही. त्यासाठी काळानुरुप बदल स्विकारावे लागतील. या विचारातूनच बहुतांशी उद्योग व्यवसायानी ङ्गकॉर्पोरेट संवादफ या प्रणालीचा स्विकार केलेला आहे.

    Korperet Kamyunikeshan

    125.00
    Add to cart
  • जनसंज्ञापन आणि पत्रकारिता (पेपर 2 व 3)

    विद्यापीठात किंवा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करण्यासाठी युजीसीमार्फत सेट-नेट या पात्रता परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सरावाने यात यश प्राप्त करता येते. जनसंवाद आणि पत्रकारिता (Mass Communication & Journalism) या विषयात सेट-नेट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढते आहे. या विषयाचा अभ्यासक्रम विस्तीर्ण आहे. त्या तुलनेत सेट-नेट या परीक्षांच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता अल्प आहे. त्याचसोबत पीएच्.डी पदवीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या पेट परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता देखील मार्गदर्शक पुस्तकाची मागणी वाढत आहे. सेट-नेट व पेट या तीनही परीक्षा डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेले हे पुस्तक त्यामुळेच या विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकात मागील काही वर्षीच्या सेट-नेट परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचादेखील विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे. पुस्तक लेखन करणारे डॉ.सुधीर भटकर व प्रा. विनोद निताळे या लेखक द्वयींचे मन:पूर्वक अभिनंदन. जनसंवाद आणि पत्रकारिता (Mass Communication & Journalism) या विषयात सेट-नेट,पेट या परीक्षा देणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

    – प्रा.पी.पी.पाटील,

    कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

    Jansandynapan Ani Patrakarita (Paper 2 & 3)

    375.00
    Add to cart