• पर्यावरण अभ्यास

    21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरण अभ्यास या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
    मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
    पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.

    235.00
    Add to cart