आधुनिक काळात अर्थशास्त्राचा खूपच विकास झालेला आहे. त्यामुळे अर्थशास्त्रात असंख्य गोष्टींची चर्चा किंवा विश्लेषण केले जाते. उदा. अर्थशास्त्रात वेतन, व्याज, खंड, नफा, मागणी, पुरवठा, उद्योगसंस्था, एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती, देशातील किंमत पातही, बेकारी, रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या अशा असंख्य बाबींची चर्चा किंवा विश्लेषण केले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानात लहान भागाची किंवा घटकांची चर्चा केली जाते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत जे अनेक घटक असतात त्यापैकी एखाद्या विशिष्ट किंवा व्यक्तिगत घटकांची चर्चा सूक्ष्म अर्थशास्त्रात केली जाते. अर्थव्यवस्थेत उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या चार आर्थिक क्रिया चालतात. या चार आर्थिक क्रिया पार पाडतांना प्रत्येक व्यक्ती उत्पादक किंवा उत्पादन घटक आणि उपभोक्ता या दुहेरी भूमिका पार पाडते. दुहेरी भूमिका पार पाडतांना त्याची जी वर्तवणूक असते तिचा सूक्ष्म पातळीवर व व्यक्तीगत पातळीवर अध्ययन सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्ष्यी अर्थशास्त्र असेही म्हणतात.
प्रस्तुत पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त बाजार, अल्पाधिकार बाजार तसेच खंड, वेतन, व्याज व नफा या घटकांच्या मोबदल्याची सखोल व विस्तृत मांडणी केलेली आहे.
Sukshama Arthashastra