गणित अध्यापन पद्धतीची विविध पुस्तके आज रोजी उपलब्ध आहेत. परंतु येत्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झालेल्या बदलांच्या अनुषंगाने नवीन पद्धती, तंत्रे, प्रतिमाने, मूल्यमापनाच्या पद्धती, गणिती अध्ययनपूरक उपक्रम विकसित झाले. त्यात प्रामुख्याने सहकार्य अध्ययन पद्धती, ज्ञानरचनावाद, कृती आधारीत अध्ययन, मिश्रण अध्ययन, संकल्पना चित्रण, प्रभुत्व अध्ययन या पद्धती व प्रतिमानांचा समावेश आहे. तसेच सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आणि अभ्यासक्रमातील नवीन प्रवाह यांचा सुद्धा समावेश केलेला आहे. या पुस्तकात गणिताचे स्वरुप, इतिहास, गणित अध्यापनाची उद्दिष्टे, गणित संरचना, आशययुक्त अध्यापन पद्धती संंंकल्पना व गरज, गणित अध्यापनाच्या पद्धती व उपागम, तंत्र, प्रतिमाने, गणित अध्यापनाचे नियोजन, मूल्यमापन, गणितातील अध्ययनपूरक कार्यक्रम, गणित पाठ्यपुस्तक अर्थ, उपयोग, निकष, गणित शिक्षक आणि भारतीय व पाश्चिमात्य गणितज्ञ या प्रकरणांचा समावेश केलेला आहे. पुस्तकातील प्रत्येक घटकाची मांडणी अधिकाधिक सोपी, सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील बी.एड. महाविद्यालयातील शिक्षक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, प्राथमिक-माध्यमिक-उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Ganit Ashayayukta Adhyapan Paddhati