• भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

    आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक घटक या आर्थिक व्यवहारांशी निगडित असतात. देशाच्या नैसर्गिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणातून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते. देशातील आर्थिक पर्यावरणाचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. देशाचे आर्थिक पर्यावरण अनुकूल असेल तर देशाच्या आर्थिक विकासात वाढ घडून येते. तर प्रतिकूल आर्थिक पर्यावरणामुळे देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. सदर पुस्तकामध्ये आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, परिणाम करणारे घटक, अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थाशी तुलना, कृषी पर्यावरण, शेतीची भूमिका, आव्हाने व विविध प्रवृत्ती, कृषी-औद्योगिक पर्यावरण, देशांच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका, औद्योगिक धोरण 1991, भारतीय उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, आव्हाने, बँकिंग क्षेत्र, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती, प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास वगैरे महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.

    Bhartiya Arthik Paryavan (Bhag 1)

    275.00
    Add to cart
  • सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र

    सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र यात सूक्ष्म अर्थशास्त्र-अर्थ, स्वरूप, व्याप्ती व महत्व, उपभोक्ता वर्तणूक सिद्धांत, मागणी, पुरवठा, खर्च आणि प्राप्ती विश्लेषण, बाजार रचना, घटक किंमत निश्चिती, कल्याणकारी अर्थशास्त्र या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
    सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

    Sukshmalakshi Arthashastra

    235.00
    Add to cart