भारतात प्राचीन काळापासून ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. काळानुरूप या संस्थांचे स्वरूप आणि कार्यात बदल होत गेला. भारतीय संघराज्य व्यवस्थेत लोकशाही विकेंद्रिकरणाचे धोरण स्विकारून सत्तेचे विकेंद्रिकरण करण्यात आले. त्यानुसार राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकार, घटकराज्य स्तरावर राज्य सरकार आणि स्थानिक स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत. विकेंद्रिकरणाच्या धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाना महत्व प्राप्त झाले. 1993 साली झालेल्या 73 व्या घटनादुरूस्तीमुळे या संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. 73 वी घटनादुरुस्ती भारतीय लोकशाही विकेंद्रिकरणाला पाठबळ देऊन सक्षम पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यास महत्वाची ठरली. 73 व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य मध्यप्रदेश ठरले. महाराष्ट्रात 23 एप्रिल 1994 पासून अंमलबजावणीस सुरूवात झाली. सक्षम लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था बळकट, प्रभावी, शक्तिशाली असणे ही काळाची गरज आहे.
Maharashtratil Sthanik Swarajya Sanstha