पालकत्व शिक्षण या पुस्तकात एकूण चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यात पालकत्व शिक्षणाचा अर्थ, स्वरुप, व्याप्ती, उद्दिष्ट्ये, मार्ग, गरज, महत्व तसेच पालकांचा बालकाच्या शिक्षणात व शाळेत सहभाग, पालक शिक्षक संघ, पालकांची भूमिका व जबाबदार्या, कुटूंबाचा, सामाजिक व आर्थिक स्थितीचा परिणाम, पालकत्व शैली, पालकत्व शिक्षणातील नवप्रवाह यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या पुस्तकातून पालकत्व शिक्षणाबद्दल अपेक्षित व तपशीलवार मुद्देसूद माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून संपूर्ण अशी माहिती किंवा ज्ञान आपणास मिळणार नाही. परंतु याचा शिक्षण क्षेत्रातील उपयोग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना या पुस्तकाद्बारे एकाच ठिकाणी पालकत्व शिक्षणाचे साहित्य उपलब्ध होईल व त्यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल अशी खात्री आहे.
Palaktva Shikshan