• अर्थशास्त्राची मूलतत्त्वे

    अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील घटकांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. 16 व्या व 17 व्या शतकात व्यापारवादी विचारवंतानी शासनाला ज्या शिफारसी व धोरणे सुचविली ती अर्थव्यवस्थेसंदर्भातच होती. 18 व्या शतकात निसर्गवादी फ्रेंच विचारवंतानीसुध्दा राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती यावर विश्लेषण केलेले दिसून येते. तसेच अ‍ॅडम स्मिथ, रिकार्डो, जे.एस.मिल यांच्या सिध्दातांतही राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण वेतन, एकूण खंड व एकूण नफा यामध्ये होणार्‍या विभाजनाविषयी चर्चा केलेली आढळते. 1929 च्या जागतिक महामंदीनंतर मात्र अर्थशास्त्रीय विचारात मूलभूत व क्रांतिकारी बदल झालेले दिसतात. लॉर्ड केन्स यांचे 1936 मध्ये ‘द जनरल थिअरी’ हे युगप्रवर्तक पुस्तक प्रकाशित झाले. केन्सने प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्राचा पाया रचला. सदर पुस्तकामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या, उपयोगिता दृष्टीकोण, मागणी व मागणीची लवचिकता, उत्पादन फलन, उत्पादन व्यय, प्राप्ती किंवा उत्पन्न ह्या अर्थशास्त्रातील विविध मूलभूत बाबींचा उहापोह केला आहे.

    Arthashasarachi Multatve

    195.00
    Add to cart
  • व्यावसायिक अर्थशास्त्र

    ‘व्यावसायिक अर्थशास्त्र’ ह्या पुस्तकाचा उपयोग बी.कॉम. भाग 1 च्या विद्यार्थ्यांसोबतच बी.ए.व एम.ए. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सुध्दा होणार आहे. सदर पुस्तकामध्ये व्यावसायिक आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र, बाजार संरचना, विविध बाजारपेठांतील किंमत निश्चिती, उत्पादन घटकांच्या किंमतीचे निर्धारण ह्या अर्थशास्त्रातील विविध मूलभूत बाबींचा ऊहापोह केला आहे.

    अर्थशास्त्राचा मूळ अभ्यासविषय हा अ‍ॅडम स्मिथने संपत्तीचा अभ्यास म्हटले आहे. पुढे त्याचा विस्तार झाला परंतु संपत्ती हा महत्वाचा विचार अर्थशास्त्राचा आहे. संपत्तीच्या निर्मितीकरिता जे प्रयत्न किंवा कार्य करण्यात येते त्यामध्ये व्यवसाय ही संज्ञा महत्त्वाची ठरते. प्रा.जोएल डीन यांचा ’चरपरसशीळरश्र एलेपेाळलीश’ हा ग्रंथ 1951 मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाने ‘व्यावसायिक अर्थशास्त्र’ ही अर्थशास्त्राची नवीन शाखा जन्मास घातली.

    Vyavsayik Arthashastra

    250.00
    Add to cart