स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपलाही काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन केले. आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध घडामोडींची माहिती या ग्रंथातून होणार आहे. या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या, सुटसुटीत भाषेत, मुद्देसूद केलेली आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थी, वाचकांना समजण्यास सोपे जावे म्हणून प्रत्येक ठिकाणी चौकटींची रचना करून त्यात मुद्दे दिले आहेत. चित्रांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात भारतात ब्रिटिशांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्तास्थापनेपर्यंतचा, 1857 चा उठाव, कारणे आणि परिणाम, भारतातील सामाजिक, धार्मिक, सुधारकांचे कार्य, काँग्रेसची स्थापना, मवाळ-युग, टिळक युग, गांधी युग, भारतातील क्रांतीकारक, मुस्लिम लिग व भारताची फाळणी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी पाठविलेल्या विविध समित्या, यांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय भारताची फाळणी आणि स्वातंत्र्याचा कायदा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्यांचीही माहिती आलेली आहे. एकूणच भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळून 1950 मध्ये घटना लागू होऊन भारत लोकशाहीप्रधान देश बनण्यापर्यंतची ऐतिहासिक माहिती म्हणजे हा ग्रंथ!
Bharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)